Home » कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत सौर पंपांचे नवीन दर जाहीर…
Agriculture

कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत सौर पंपांचे नवीन दर जाहीर…

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.शेतकऱ्यांना गेल्या काही दशकांपासून निसर्गाची अवकृपा,सरकारी अनास्था,कर्जबाजारीपणा यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे.मात्र यावर उपाय म्हणून सध्या  शेतकऱ्यांच्या हितासाठी च्या काही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अमलात आणल्या जात आहेत.

त्यापैकीच एक म्हणजे कुसुम सोलार पंप योजना होय.ही योजना 2021साली केंद्र शासनाने राबवली आहे.या योजनेअंतर्गत कमी दरामध्ये सौरऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट अपेक्षित आहे.या योजनेअंतर्गत एक लाख सौर पंप उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.या योजनेमुळे शेतकऱ्या यांना वीजेवर चालणा-या पंपाचा खर्च कमी करून 24 तास पाण्याची उपलब्धता राहू शकते व वीज पंपांवर येणारा खर्च अन्यत्र कोठे वापरला जाऊ शकतो.या योजनेसाठी नोंदणी करण्याची फी शंभर रुपये आहे.

2022 सालच्या सुरुवातीसच कुसुम सौर पंप योजनेचे दर जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या सौर पंपचे चे दर पुढील प्रमाणे आहेत.हे दर वर्गनिहाय वेगवेगळे ठरवण्यात आले आहेत.

सौर पंप योजनेअंतर्गत सौर पंपचे दर पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत-

 • जी एस टी किमतीसह सौर पंपांचे दर

1) 3 एच डी पी सी  सौर पंप चे दर 1093805 रूपये आहे.
2) 5 एच डी पी सी  सौर पंप चे दर 269786 रू. आहे.
3) 7.5 एच पी डी सी सौर पंप चे दर 37440 रू. आहे

कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत वर्गनिहाय सौर पंपाचे दर

 • खुला प्रवर्ग
  १) 3 एच डी पी सी-मूळ किंमत-17030 रू.जीएसटी-18.3=2853 रू.जीसटी सह किंमत-19380 रु.
  २) 2.5 एच डी पी सी-मूळ किंमत-23070 रू.जीएसटी-18.3 =3171 जीएसटीसह किंमत=26975 रु.
  ३) 7.5 एच डी पी सी-32940 रु.जीएसटी-18.3=4540रु.जी एसटी सह किंमत- 37440रू.
 • अनुसूचित जाती व जमाती
  १) 3 एच डी पी सी=मूळ किंमत -8515 रू.जीएसटी-18.3=1175 रू.जीएसटीसह एकूण किंमत=9690 रू.
  २) 5 एचडी पीसी=11852 रू.जी एसटी=18.3=1650रू.जीएसटीसह एकूण किंमत=13488 रू.
  ३) 7.5 एचडी पीसी- 16450 रु.जीएसटी-18.3=2270 रु.जी एसटी सह एकूण किंमत =18720 रू.

अधिकृत संकेतस्थळावर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे व नोंदणी फॉर्म सुद्धा उपलब्ध आहे.