Home » महाराष्ट्रामध्ये कृषी दिन का साजरा केला जातो…
Agriculture

महाराष्ट्रामध्ये कृषी दिन का साजरा केला जातो…

महाराष्ट्रामध्ये 1 जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तसेच जुलै मधील पहिला आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला खायला अन्न मिळते.त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाला खूप महत्त्व दिले जाते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करतात.कृषी क्षेत्रामधील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून 1 जुलैला त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.

भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु महाराष्ट्रला देखील कृषीप्रधान राज्य म्हंटले जाते.महाराष्ट्रातील शेतकरी दिवसरात्र कष्ट करून सर्वांचे पोट भरतो.शेतीला आधुनिक रूप देण्यासाठी वसंतराव नाईक यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना देखील केली.शेतकऱ्यांना बी-बीयाने उपलब्ध करून दिली.

१९७२ साली पडलेल्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले.राज्यभर हा दिवस वेगवेगळे उपक्रम ठेवून साजरा केला जातो.

बीइंग महाराष्ट्रियन कडून सर्व शेतकरी मित्रांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…