Home » शेतकऱ्यांसाठी येणार सोन्याचे दिवस लवकरचं रतन टाटा उचलणार हे मोठे पाऊल.
Agriculture

शेतकऱ्यांसाठी येणार सोन्याचे दिवस लवकरचं रतन टाटा उचलणार हे मोठे पाऊल.

भारतातील अनेक उद्योग असे आहे ज्यांनी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतामधील अंबानी,अदानी यांनी परदेशामध्ये सुद्धा अनेक उद्योग खरेदी केले आहेत. मात्र या सर्व उद्योगांमध्ये वेगळेपण टिकले आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटा उद्योग समूहाने.आतापर्यंतचा टाटा उद्योग समूहाचा प्रवास पाहिला असता टाटा उद्योग समूहाने खऱ्या अर्थाने देशाभिमान व देश उपयोगी कार्य करण्याचा वसाच घेतला आहे हे स्पष्ट दिसून येते. नुकतेच टाटा उद्योग समूहाने एअर इंडिया या तोट्यात असणाऱ्या उद्योग समूहाला विकत घेतले आहे तेसुद्धा भरगच्च रक्कम अदा करून.

या अगोदरही अनेक दिवाळखोरीत निघालेल्या उद्योगांना तारले ते टाटा उद्योग समूहाने. टाटा उद्योग समूहाने या औद्योगिक व्यवहारांमध्ये नव्हे तर अगदी उद्योगसमुहा मध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना सुद्धा दिल्या जाणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. टाटा उद्योग समुह भारतामधील पायाभूत सुविधा व सर्व दुर्बल घटकांना सोबत घेऊन विकासाकडे नेणारा उद्योग समूह आहे. हे नुकतेच टाटा उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या बाबतीत विकसित केलेल्या एका तंत्रज्ञाना मधून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जात असले तरीही खऱ्याअर्थाने व्यवस्थेचा व निसर्गाच्या अवकृपेने चा बळी हा नेहमीच शेतकरी ठरतो हे दिसून येते. शेतकऱ्याला निसर्गाच्या सर्व अडचणींना तोंड देत कितीही जोमाने पीक पिकवले तरीही त्याला बाजार भाव योग्य मिळेलच याची खात्री नसते.जेव्हा शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेव्हा बर्‍याचदा त्याला योग्य असा भाव मिळत नाही खूपदा तर त्याचा पिक घेण्यासाठी चा खर्च सुद्धा भरून निघत नाही.याउलट हा माल साठवून जेव्हा या मालाला किंमत असेल तेव्हा तो माल विक ण्यास काढला तर निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो.

मात्र भारतामध्ये हरित क्रांतीनंतर सुद्धा साठवणुकीचे आधुनिक तंत्रज्ञान अद्यापही विकसित झालेले नाही. व्यापारी वर्ग मात्र भांडवलाच्या जोरावर शेतकऱ्यांकडून हा माल खरेदी करून तो साठवून ठेवतात व योग्य वेळी तो माल बाहेर काढून चढ्या भावाने विकतात. काही पिकांच्या बाबतीत तर शेतकऱ्यांना अनेकदा खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. कांदा हा त्यात पिकांपैकी एक होय. व कांदा साठवून ठेवून जर योग्य वेळी विकण्यास काढला तर शेतकरी मालामाल होऊ शकतो मात्र यासाठी आवश्यक ते साठवणुकीचे तंत्रज्ञान अद्यापही आपल्याकडे नाही. यावरच उपाय म्हणून टाटा उद्योग समूहाने अग्रो सोल्युशन नेस्ट तंत्रज्ञान कांद्याच्या साठवणुकीसाठी विकसित केले आहे.

कांदा शेतकऱ्याला योग्य तो नफा मिळवून देऊ शकतो. मात्र यासाठी कांद्याची साठवणूक ही तंत्रशुद्ध पद्धतीने केली जाणे आवश्यक आहे .कांद्याला साठवण्याचे एक विशिष्ट तंत्र असते. कांद्याला खराब हवामान किंवा वातावरणातील बदलांमुळे लगेच परिणाम होऊ शकतो.

टाटा कंपनीच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन नेस्टने या तंत्राची निर्मिती केली आहे. टाटा कंपनीच्या ॲग्रो सोल्युशन नेस्टमुळे जास्त काळासाठी साठवता येणार आहे व टिकवता ही येणार आहे. यामुळे निश्चितच आगामी काळात शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो.