Home » गौतम अदानी हे मुकेश अंबानीला मागे टाकून कसे झाले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…
Article

गौतम अदानी हे मुकेश अंबानीला मागे टाकून कसे झाले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…

मागच्या दोन वर्षांपासून अदानी यांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे.एवढी वाढ झाली कि त्यांनी संपत्तीच्या बाबतीमध्ये मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे.बुधवारी शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली,तेव्हाच रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली त्यामुळे अदानी आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

सौदी अरबच्या अरामको सोबत केलेली दिल रद्द झाल्यामुळे रिलायन्सला बसला फटका… 

सौदी अरबच्या अरामको कंपनीची आणि रिलायन्सची एक डील होणार होती ती रद्द झाल्यामुळे रिलायन्स शेअर्समध्ये फार मोठी घट झाली याचा रिलायन्स इंडस्ट्रीला फार मोठा फटका बसला आहे त्यामुळे त्यांच्या महसुलात खूप मोठी घसरण झाली.जर आज बघितले तर रिलायन्स शेअर्समध्ये १.४४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ…

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये ४.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि अदानी एन्टरप्राईजच्या शेअर्समध्ये २.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.अदानी ग्रुपच्या सहा कंपन्या लिस्टेड आहे.गेल्या वर्षीच्या विचार केला तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये १४.३ अब्ज डॉलर्सने वाढ झाली तर अदानी यांच्या संपत्तीमध्ये ५५ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली.