Home » बुधवार पेठेतील देहविक्री करणे हा गुन्हा असतानाही पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांवर पोलीस कारवाई का करत नाही?
Article history News

बुधवार पेठेतील देहविक्री करणे हा गुन्हा असतानाही पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांवर पोलीस कारवाई का करत नाही?

पुणे तिथे काय उणे ही उक्ती मिरवणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांना अर्थात पेठांनी वैशिष्ट्यांनुसार त्यांची नावे देण्यात आली आहे. विविध पेठा निरनिराळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा आहे.अशीच एक पेठ म्हणजे बुधवार पेठ होय.बुधवार पेठ ही लक्ष्मी रोड, तुळशीबाग या व्यापारी पेठा असलेल्या भागांनी वेढलेली आहे व या ठिकाणचे रस्ते सुद्धा संध्याकाळच्या वेळी गजबजू लागतात.

दिवसभर खरेदी साठी गर्दी करणा-या ग्राहकांमध्ये संध्याकाळी मात्र हे ग्राहक असतात बुधवार पेठ मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायासाठी.बुधवार पेठ हा भाग अचानक पणे नावारूपास आलेला नसून फार पूर्वीपासून हा परिसर वेश्या व्यवसायासाठी ओळखला जातो. बुधवार पेठेच्या निर्मितीसाठी विविध प्रकारचे ऐतिहासिक दाखले दिले जातात.

आजघडीला बुधवार पेठ हा संपूर्ण देशातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जवळ पास सातशेच्या आसपास असलेल्या कुंटणखान्यात  पाच हजार च्या आसपास मुली व महिला वेश्या व्यवसाय करतात.बुधवार पेठ अल्पवयीन मुलींच्या विक्री, एड्सचे संक्रमण इत्यादी विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

बुधवार पेठ पुण्यामध्ये पेशव्यांच्या साम्राज्याची सुरुवात होण्याआधी पासून अस्तित्वात होती. त्यावेळी या परिसराला बावनखणी असे म्हटले जात असे .काही ठिकाणी या परिसराचा उल्लेख दाणे आळी सुद्धा केला जातो. दाणे आळी हा परिसर शनिवार वाडा पासून थोड्या अंतरावर सुरू होत होता असे सांगितले जाते. या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असे.

ब्रिटिशांनी पुण्यावर आपले राज्य प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश सैनिकांसाठी काही खास प्रकारच्या सुधारणा या परिसरामध्ये केल्या गेल्या‌. ब्रिटिश व्यापारी सुद्धा या परिसराकडे आकर्षिले गेले होते. ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांना भारतामध्ये राहण्यासाठी व त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी या व्यवसायाला जणू कायदेशीर मान्यता दिली होती.