Home » मराठा आरक्षणाला विरोध आणि एस.टी आंदोलनाला पाठिंबा देणारे गुणरत्न सदावर्ते आहे तरी कोण?
Article

मराठा आरक्षणाला विरोध आणि एस.टी आंदोलनाला पाठिंबा देणारे गुणरत्न सदावर्ते आहे तरी कोण?

मराठा आरक्षणाला विरोध करणं असो की सध्या सुरू असणारे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामध्ये एका नावाची चर्चा होत आहे ते म्हणजे ऍड.गुणरत्न सदावर्ते.त्यांच्या पत्नी ऍड.जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या बाजूने गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.आता सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील गुणरत्न सदावर्ते दाखल झाले आहे.

गुरुवारी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलतांना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचे जाहीर केले होते.या दोघांनी जरी माघार घेतली असली तरी ऍड.गुणरत्न सदावर्ते हे विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे.

तर आज आपण जाणुन घेणार आहोत की ऍड. गुणरत्न सदावर्ते हे कोण आहेत…

गेल्या काही वर्षांपासून ऍड.गुणरत्न सदावर्ते यांचे नाव खूप चर्चेत आले आहे मंग ते मराठा आरक्षणाचा लढा असो नाहीतर सध्या सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन त्यांनी न्यायालयामध्ये अशा अनेक केस लढलेल्या आहेत.ऍड.गुणरत्न सदावर्ते हे मूळ नांदेड जिल्ह्यातील आहे.

त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबई येथे झालेले आहे.ते पहिल्यापासूनच सामाजिक चळवळीत पुढे असायचे.त्यांनी नांदेड येथे ‘विद्यार्थी आंदोलन’ ही संघटना सुरू केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न मांडले होते.गुणरत्न सदावर्ते हे मुंबईमध्ये स्थयिक झाले आणि त्यांनी तिथेच वकिलीचे काम सुरु केले.त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केलेली आहे.गुणरत्न सदावर्ते हे दोनदा मॅटच्या बार असोशिएशनचे अध्यक्ष झालेले आहे.

त्यांची पत्नी ऍड. जयश्री पाटील सदावर्ते आहे आणि त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव झेन सदावर्ते आहे.२०१८ मध्ये परळमधील ‘क्रिस्टल प्लाझा’ या इमारतीला आग लागली होती तेव्हा त्यांच्या १० वर्ष्याच्या मुलीने त्या इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना तिने सावधगिरीचे उपाय सांगितले होते.त्यामुळे १७ जणांचे प्राण बचावले होते.त्यामुळे झेन सदावर्ते हिला तिच्या या कार्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला आहे.