Home » मुंबईचा सुपारी किंग ते दगडी चाळीतील डॅडी! अरुण गवळीची खरी कहाणी…
Article

मुंबईचा सुपारी किंग ते दगडी चाळीतील डॅडी! अरुण गवळीची खरी कहाणी…

पांढरा पायजमा आणि पांढरा कुर्ता घालणारा मुंबईचा डॉन अरूण गवळी याचे दररोज दाऊद इब्राहिम च्या टोळीसोबत काहीना काही वाद होत असत.अरुण गवळी चा दाऊद इब्राहिम सोबत छत्तीसचा आकडा होता.नव्वदच्या दशकामध्ये सुपारी डॉन किंवा डॅडी या नावाने अरूण गवळी प्रसिद्ध झाला.गँगस्टर नंतर अरूण गवळीने राजकारणातही पाऊल ठेवले.नव्वदच्या दशकात मुंबईमधील बॉम्बस्फोटानंतर देशभरातील कुख्यात गुंड देशाबाहेर पलायन करून गेले मात्र अरुण गवळी हा एकमेव डॉन भारतामध्ये राहिला.

17 जुलै 1955 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अरूण गवळीचा जन्म झाला.1970च्या दशकात अरुण गवळी गाव सोडून मुंबईमध्ये आला.सुरवातीच्या काळामध्ये मुंबई मध्ये अरुण गवळी कपड्याच्या गिरणीमध्ये काम करत होता.मात्र 1970 ते 1980 या काळात कपड्याच्या गिरण्यांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या आंदोलनांमुळे अनेक गिरण्या बंद पडल्या.अनेक कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली.यामध्ये अरूण गवळी सामील होता.बेरोजगार झाल्यानंतर अरूण गवळी रामा नाईक व बाबू रेशीम भायखळा कंपनीमध्ये सहभागी झाला.

हा गट भायखळा परेल या भागांमधील गुन्हेगारी विश्व चालवत होता.1984 -88 या काळामध्ये कंपनीने दहा वर्षे यांची अनेक कामे केली.1988 साली एका एन्काऊंटर मध्ये रामा नाईक मृ’त्यू झाल्यानंतर भायखळा कंपनीचा कारभार अरूण गवळीने सांभाळण्यास सुरुवात केली.दगडी चाळ या आपल्या घरांमधून अरुण गवळीने हे गुन्हेगारी विश्व सुरू ठेवले.दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा  निर्माण होण्यामागे तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती.

1988 साली रामा नाईक यांचा एन्काऊंटर झाला तेव्हा त्यामागे दाऊद इब्राहिम चे कारस्थान होते असे सांगितले जाते.त्यानंतरच दाऊद इब्राहिम आणि गवळी गॅंग मध्ये वॉर सुरू झाले.गवळी गॅंग खूपच खतरनाक होती व यामुळे डी गॅंग मधील छोटा शकील,छोटा राजन,सुनील सावंत यांसारखे डॉन दुबईला रवाना झाले.अरुण गवळीने या नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये आपले पाऊल ठेवले.2004 साली अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला व मुंबईतील चिंचपोकळी या विधानपरिषद मतदार संघातून निवडूनही आला.

मात्र अरुण गवळी यांचा भाचा सचिन अहिर त्यांचा पक्ष सोडणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळे अरुण गवळी यांचे राजनीतिक भवितव्य धोक्यात आले.अनेक दशके मुंबईत गुन्हेगारी साम्राज्याची दहशत कायम ठेवणारा हा डॉन पोलिसांच्या तावडीतून सुटत गेला ते केवळ कोणताही ठोस पुरावा त्याच्याविरोधात न सापडल्यामुळे.मात्र 2012 साली पक्षाचा नेता कमलाकर जामसंडेकर यांच्या खुनाच्या आरोपाखाली पुरावे सापडल्यामुळे अरुण गवळी ला अटक झाली व शिक्षाही सुनावण्यात आली.

अरुण गवळी ला जुबेदा या मूलीबाबत प्रेम वाटू लागले व त्याने सर्वांच्या विरोधात जाऊन तिच्या सोबत विवाह केला.विवाहानंतर जुबेदा चे नाव आशा गवळी झाले व ती अरुण गवळीच्या अनुपस्थितीमध्ये लेडी डॉन बनून सर्व कारभार सांभाळू लागली.दाऊद इब्राहिम ची बहिण हसीना पारकरच्या पतीचा खून अरुण गवळीच्या सांगण्यावरूनच करण्यात आला होता व म्हणूनच 1990 साली अरुण गवळीचा भाऊ किशोरचा खून केला.दाऊद आणि अरुण गवळीच्या दुश्मनी चे प्रमुख कारण हेच असल्याचे सांगितले जाते. 

एक काळ असा होता जेव्हा अरुण गवळी ला शिवसेना पक्ष प्रत्यक्षपणे पाठिंबा देत होता.एका भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की पाकिस्तान कडे दाऊद इब्राहिम आहे तर भारताकडे ही अरुण गवळी आहे.मात्र नंतर हे चित्र पालटलं.2004 साली विधानसभा निवडणुकांमध्ये चिंचपोकळी मतदारसंघातून अरुण गवळी अकरा हजार मतांच्या मताधिक्क्याने जिंकून आला होता.