Home » शरद पवारांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात…
Article

शरद पवारांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात…

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस झाला आहे.शरद पवार यांचे राजकारणामध्ये मोलाचे योगदान आहेच.परंतु त्याचबरोबर सामाजिक,शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही अत्यंत मोलाचे योगदान आहे.महाराष्ट्रामध्ये काही पुरोगामी महत्वाच्या निर्णयांची अंमलबजाबणी करण्यात देखील शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता.

त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात.देशभरातील महिलांना चूल आणि मूल याशिवाय पुढे जाऊ देत नसे परंतु या मर्यादेपलीकडे जात राष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी महिलांना ३३ % आरक्षणहून ५० टक्के वर पोहोचले त्यामुळेच आज महिलांना बाहेर निघण्याची मुभा मिळाली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी महिलांना विविध क्षेत्रात ५० % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.यापुढे शरद पवार यांनी ते केंद्रीय संरक्षण मंत्री असतांना महिलांना गृह खात्यामध्ये काम करण्याची संधी दिली.त्यांचे हे कार्य सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखी आहेत.

घरांमधील महिला हीच घराची कुटुंब प्रमुख असेल हे धोरण देखील शरद पवारांनी आमलात आणले.त्यामुळेच महिलांना पुरुषांबरोबर काम करण्याचा दर्जा मिळाला.