Home » असा होतो सैन्यातील कुत्र्यांचा दुर्दैवी अंत, जाणून घ्या
Article News

असा होतो सैन्यातील कुत्र्यांचा दुर्दैवी अंत, जाणून घ्या

कुत्रा हा सगळ्यात इमानदार प्राणी मानला जातो व कुत्रा हा माणसाचा सगळ्यात जास्त इमानदार मित्र असतो असेसुद्धा म्हटले जाते. म्हणूनच आजकाल कुत्रा पाळण्याचे फॅड खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. कुत्रा हा वेळ आली तर आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या धन्याचे रक्षण करतो हे अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे.

मात्र अशा या इमानदार कुत्र्याला कधीकधी कशा प्रकारे शेवटाला सामोरे जावे लागते हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण सैन्य दलासाठी काम करणाऱ्या कुत्र्यांचा शेवट कशा प्रकारे होतो हे जाणून घेणार आहोत. सैन्यदलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर करून त्यांना डॉग्स स्क्वॅड मध्ये भरती केले जाते व या डॉग्स स्क्वॅडकडून अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची अगदी सराईतपणे चौकशी केली जाऊ शकते.

बोलता येऊ न शकणाऱ्या मुक्या कुत्र्याला जनावरांकडून सैन्य दलातील अनेक अवघड कामे ही पूर्ण केली जातात .मात्र जेव्हा सैन्यदलातील कुत्रा रिटायर होतो तेव्हा त्याला सैन्यातील व्यक्तींकडूनच ‘गो’ळी मारून ‘ठा’र केले जाते. यामागचे कारण नक्की काय आहे अशी उत्सुकता सर्वांनाच वाटते म्हणूनच माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत एका व्यक्तीने सैन्यदलाला सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर कुत्र्याला ‘गो’ळी मारून का ‘ठा’र केले जाते अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर म्हणून काही सुरक्षाविषयक कारणांमुळे हे पाऊल अतिशय जड अंतकरणाने उचलले जात असल्याचे उत्तर देण्यात आले होते.

सूत्रांच्या मते संरक्षण दलाला सैन्यातून निवृत्त झालेल्या प्रशिक्षित कुत्र्यांना एखाद्या अशा व्यक्तीच्या हाती लागून की जी व्यक्ती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हानी पोचू शकते हे निश्चितच धोक्याचे आहे.

 सैन्यदलामध्ये प्रशिक्षण देण्यात आलेल्या कुत्र्यांना सैन्यदलाच्या काही गोपनीय ठिकाणीसुद्धा प्रवेश देण्यात आलेला असतो त्यामुळे अशा ठिकाणांची माहिती काढण्यासाठी किंवा अशा ठिकाणी सुरक्षाविषयक धोका निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती ही संरक्षण दलाला वाटते.

संरक्षण दलामध्ये असताना या कुत्र्यांना योग्य ते प्रशिक्षण तर दिले जाते पण त्यांची काळजीसुद्धा घेतली जाते.ते आजारी असतील तर त्यांना योग्य ते उपचार केले जातात पण ते सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर मात्र त्यांचा अंत हा अतिशय दुर्दैवी व वेदनादायी असतो.