Home » झोपण्यापूर्वी ५ मिनिटे करा ‘या’ गोष्टी ताबडतोप मिळेल जे हवं ते…!
Article

झोपण्यापूर्वी ५ मिनिटे करा ‘या’ गोष्टी ताबडतोप मिळेल जे हवं ते…!

झोपण्या अगोदर आपण काय करतो यावर आपल्या झोपेचा पँटर्न निश्चित होतो. चांगल्या झोपेवरच आपली दिनचर्या निर्भर करते. आपला मूड व आपली उर्जा ही सकारात्मक असेल तर आपल्याला झोप शांत लागू शकते. शांत व पुरेशी झोप घेणे आरोग्याच्या व मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे.

सध्या शांत व पुरेशी झोप न मिळणे ही एक जागतिक आरोग्य समस्या बनली आहे. शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी काही मिनिटे आधी खूप महत्वाची आहेत. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी या छोट्या-छोट्या टिप्सचे पालन करणे नक्कीच फायदेशीर ठरते. आज आपण अशाच काही गोष्टी आपण रात्री झोपण्यापूर्वी पालन केले तर शांत व पुरेशी झोप होईल त्या जाणून घेणार आहोत.

  1. यशस्वी व्यक्ती झोपायला जाण्या अगोदर साधारण अर्धा तास वाचन करतात. झोपायला जाण्यापूर्वी च्या वेळेचा सदुपयोग निरनिराळ्या विषयांवरची माहिती साठी केला जातो.
  2. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि इंटरनेट वर चँटिंग करणे या गोष्टी केल्या जातात. मोबाईल किंवा इंटरनेटवरील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे साम्य हे सूर्यप्रकाशाशी असते. आपल्या शरीराला झोप कधी घ्यायची व कधी उठायचे बद्दल करणाऱ्या मेलाटोनि कार्य विस्कळीत होते. यासाठी झोपायला जाण्याअगोदर चाळीस मिनिटे अगोदर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या ऑफिसशी निगडीत इंटरनेटवरील काम बंद करावे.
  1. दिवसभरामध्ये अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे आपल्या मनावर ताण आलेला असतो यामुळे रात्री शांत झोप लागणे शक्य होत नाही. अशा वेळी दिवसभरामध्ये अपूर्ण राहिलेल्या कामांच्या बाबतीत दुसऱ्या दिवशी आपण काय कृती करणार आहोत याची एक यादी बनवली तर अनावश्यक ताण दूर होतो व शांत झोप लागणे शक्य होते.
  2. झोपायला जाण्यापूर्वी आपल्या घरातील व्यक्तींसोबत, मुलांसोबत किंवा पाळीव प्राण्यां सोबत वेळ घालवणा-या व्यक्तींच्या मनावरील अतिरिक्त ताण दूर झालेला असतो. ते लवकर झोपतात असे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. आपल्या दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडी बद्दल आपल्या जोडीदारासोबत मोकळे करणे सुद्धा चांगली व लवकर झोप येण्यासाठी चा उत्तम उपाय आहे.
  3. शारीरिक कष्ट घेतले असता लवकर झोप लागते यासाठी दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा व्यायाम अवश्य करावा. व्यायामासाठी असा खास वेळ देणे शक्य नसेल तर संध्याकाळच्या वेळी काही मिनिटे चालले तरीही शरीराला फायदेशीर ठरते.
  4. काही व्यक्ती झोपायला जाण्यापूर्वी साधारण दहा मिनिटे प्राणायाम व ध्यान धारणा करतात त्यामुळे मनाला शांती लागते व दिवसभरातील तणावाचे विचार दूर होतात.
  5. झोपण्यापूर्वी उबदार पाण्याने अंघोळ केली असता शरीरातील नसा मोकळ्या होतात व शरीराला झोपेची गरज निर्माण होते.
  6. व्यक्ती झोपण्यापूर्वी आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून आपल्या इच्छा आकांक्षाविषयी  याविषयी खूप सकारात्मक विचार मनामध्ये आणते ती निश्चित यशस्वी होते.
  7. झोपण्यापूर्वी आपल्या मनामध्ये असलेले सर्व असुरक्षित नकारात्मक विचार बाजूला करण्याचा प्रयत्न करावा व आपल्याला जे काही ध्येय गाठायचे आहे ते पूर्ण झाले आहे असा कल्पनाविलास करावा.