Home » सोने-चांदी नव्हे तर चक्क आईच्या दुधापासून दागिने बनवून ही कंपनी कमावतेय करोडो रुपये…!
Article

सोने-चांदी नव्हे तर चक्क आईच्या दुधापासून दागिने बनवून ही कंपनी कमावतेय करोडो रुपये…!

एखाद्या घरामध्ये लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या हसण्याने,रडण्याने घरातील वातावरण अगदी बदलून जाते.कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलांचे पहिले हसणे,रडणे,पहिल्यांदा चालणे इत्यादी सर्व आठवणी जपून ठेवण्याची इच्छा असते.मोबाईलच्या जमान्यामध्ये या सर्व आठवणी जपून ठेवणे अगदी सोपे झाले आहे मात्र या पुढे जाऊन काही महिला सध्या आई आणि बाळा मध्ये असलेला स्तनपानाचा सर्वात नाजूक व मायेचा बंध जपून ठेवण्यासाठी ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीचा आधार घेत असल्याचे समोर आले आहे.

अनेकांना ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी या प्रकाराबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसेल मात्र हे खरे आहे. यूकेमधील मैजेंटा फ्लॉवर्स कंपनी ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी च्या व्यवसायामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीचे संस्थापक साफिया व एडम रियद हे या व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत व आत्तापर्यंत अनेक मातांनी या कंपनीकडून आपल्या स्तनपानाच्या आठवणीला जपून ठेवण्यासाठी ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी बनवून घेतली आहे.सध्या संपूर्ण जगभरामध्ये ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी बनवून घेण्याचा ट्रेंड वाढत आहे.

2019 साली साफिया आणि ॲडम रियाद यांनी मेजंता फ्लॉवर्स या कंपनीची स्थापना केली आत्तापर्यंत तर संपूर्ण जगभरातील चार हजार पेक्षा जास्त ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत.1.5 मिलियन डॉलर्स इतका व्यवसाय आत्तापर्यंत या कंपनीने केलेला आहे.आपल्या स्तनपानाच्या सर्वात प्रेमळ आठवणी एखादे मौल्यवान खड्यांच्या किंवा रत्नाच्या स्वरुपात जतन करून ठेवणे ही कल्पना यामागे आहे.ज्या मातांना आपल्या मुलांना दीर्घकाळ स्तनपान करता आले नाही त्यांच्यासाठी ही कल्पना खूपच अविस्मरणीय आहे.

मेजेंटा फ्लॉवर्स ही कंपनी या ज्वेलरी चे निर्माण करण्यासाठी सातत्याने संशोधन करत आहे.या कंपनीने बनवलेल्या ज्वेलरी मधील दुधाचा रंग वर्षानुवर्षे बदलत नाही.या कंपनीतर्फे ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी साठी ब्रेसलेट,झुमके,अंगठी इत्यादी पर्याय उपलब्ध करून दिले जातात.कोणत्याही ग्राहकांची ऑर्डर आल्यावर त्यांच्याकडून किमान 30 मिलीमीटर दूध मागवले जाते.ही ज्वेलरी आपल्या मुलांच्या नावसह बनवता येते.