Home » आयुष्यात यशस्वी होयचं असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या ‘४’ गोष्टींचे करा पालन…!
Article

आयुष्यात यशस्वी होयचं असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या ‘४’ गोष्टींचे करा पालन…!

आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आचरण आणि व्यवहार करताना काही मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जातो. मार्गदर्शक तत्व आणि मूल्य यांचा समावेश आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी करण्यात आला आहे. गेल्या अनेक शतकांपासून आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति ला आपल्या आयुष्यामध्ये आजसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आणि समर्पक ठरतील असे तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ मानले जाते.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये सांगितलेली मूल्य आज सुद्धा आधुनिक काळामध्ये उपयुक्त आहेत. काही मुल्य ही कालातीत असतात याची प्रचिती ही चाणक्य नीती मधील अशा काही मुल्या द्वारे येते जी आजसुद्धा अनुकरणीय आहेत.

  1. संपत्ती हा मनुष्याच्या सामाजिक प्रतिष्ठेचा सन्मानासाठी चा प्रमुख घटक मानला जातो.ज्या व्यक्ती कडे संपत्ती आणि पत असते त्याला समाजामध्ये मानाचे स्थान दिले जाते व याउलट ज्या व्यक्ती कडे धनसंपत्ती नसते त्याला मात्र अगदी तुच्छतेची वागणूक आधुनिक काळामध्ये दिली जाते. कितीतरी शतके अगोदर चाणक्य यांनी या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.आपल्याला असलेल्या आर्थिक नुकसान बद्दल शक्यतो सगळीकडे बोलणे टाळावे. ज्या व्यक्ती ला आर्थिक नुकसान झालेले असते अशा व्यक्तीला नातेवाईक ,मित्रमंडळी दूर ढकलतात. अशा व्यक्तीला मदत करण्यास कोणीही पुढे सरसावत नाही. विशेषतः व्यापारी वर्गाने या मूल्यांचे पालन अवश्य करावे असे चाणक्यनीति मध्ये सांगितले आहे.
  2. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख किंवा समस्या ही असतेच. प्रत्येकाचेच काही हितचिंतक व हितशत्रू असतात. यामुळे कधीही आपल्या समस्या किंवा दुःख हा प्रत्येका समोरच सांगू नये कारण ज्याप्रमाणे काही व्यक्ती आपल्या मित्र असतात त्याचप्रमाणे काहींना आपल्या समस्या आणि दुःखा मुळे मानसिक आनंद सुद्धा मिळतो व अशा व्यक्ती आपल्या दुःख आणि समस्या आपल्यासमोर ऐकून घेऊन मागे त्याची चेष्टा मस्करी करू शकतात.
  3. आधुनिक काळामध्ये कुटुंब व्यवस्था बदलली आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन त्याजागी विभक्त कुटुंब पद्धती रुजू लागली आहे व या विभक्त कुटुंब पद्धती मध्ये कौटुंबिक कलह वादविवाद व घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये संवाद होणे हे घटस्फोट रोखण्यासाठी व सुखी वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी खूप आवश्‍यक असते. चाणक्य नीति मध्ये या संदर्भामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांच्या मते कोणत्याही पुरुषाने आपल्या जोडीदाराच्या संदर्भातील गोष्टी या गुप्त ठेवल्या पाहिजेत. आपल्या घरातील समस्या त्यांचे वैवाहिक आयुष्यातील कलहाचे जग जाहीर प्रदर्शन करणे टाळावे व जो पुरुष आपल्या पत्नी संदर्भातील गुप्त गोष्टी या खाजगी ठेवतो तोच खरा समजूतदार पुरुष आहे असेही आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.
  4. कधीकधी आपल्यापेक्षा गुणवत्ता दर्जा यामध्ये कमी असलेल्या व्यक्तीकडून आपला अपमान केला जातो .आपल्याला अपशब्द बोलले जातात अशा अपमानास्पद संदर्भात कधीही इतरांना सांगू नये यामुळे नाचक्की होते.