Home » प्रवचनातून आलेल्या पैशातून जयाकिशोरीजी करतात हे काम, जाणून आश्चर्य वाटेल…
Article

प्रवचनातून आलेल्या पैशातून जयाकिशोरीजी करतात हे काम, जाणून आश्चर्य वाटेल…

आधुनिक काळात बेरोजगारी,वाढती लोकसंख्या,शहरी जीवनशैलीचे दुष्परिणाम,वाढती स्पर्धा या सर्व घटकांमुळे तरुण पिढी बऱ्याचदा भरकटलेली दिसून येते.आयुष्यामध्ये सर्व काही नकारात्मक घडत आहे असे या तरुणांना वाटू लागते व या सर्व तिढ्यातून सुटका करून घेण्यासाठी तरुणाई व्यसनाधीनते कडे किंवा आत्महत्या यासारख्या पर्यायांकडे झुकताना दिसून येते.आधुनिक काळातील तरुण पिढी ही तंत्रज्ञान,शिक्षण यांच्या दृष्टीने खूपच सजग आहे.

मात्र या पिढीला मानसिक शांती व मानसिक स्वास्थ्य यांची जोड देणे तितकेच गरजेचे आहे.तरुण पिढीमध्ये संयम आणि सकारात्मकता या मूल्यांना रुजवणे ही जणू काही आता गरजच बनू लागली आहे.अशीच काही सकारात्मक उदाहरण आपल्याला आपल्या आजूबाजूलाच दिसून येतात.असेच एक सकारात्मक उदाहरण म्हणजे वयाच्या अवघ्या विशी मध्ये अध्यात्म आणि विविध विषयांवर समाजाचे आपल्या प्रवचनांमधून प्रबोधन करणाऱ्या साध्वी जया किशोरी जी होय.जयि किशोरीजी या केवळ एकवीस वर्षांच्या आहेत.

अगदी लहान वयामध्ये यांचा सत्संग,अध्यात्म,धर्म धार्मिक साहित्य यांच्या वरील अभ्यास हा भल्याभल्यांना आवाक करणारा आहे. ज्या किशोरी जी यांचा जन्म राजस्थान येथील सुजानगड येथे झाला.त्या गौड ब्राम्हण कुटुंबामध्ये जन्मल्या.लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती व वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी विविध स्त्रोत आणि श्लोक यांचा अभ्यास केला.दहाव्या वर्षी जया किशोरी यांनी सुंदर कांड चे पठण सुरू केले व तेव्हापासूनच जया किशोरी जी यांचे लाखोंच्या संख्येने भक्त आहेत.

केवळ अध्यात्माकडे न वळता जया किशोरी यांनी आपले शिक्षण सुद्धा पूर्ण केले.जया किशोरी यांनी कोलकाता येथील बिर्ला वर्ल्ड अकॅडमी मधून आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांनी अध्यात्म मधील ही औपचारिक शिक्षण पूर्ण केले आहे व त्यांचे कृष्णभक्ती व कृष्णावरील प्रेम पाहून त्यांना किशोरी ही उपमा दिली गेली व त्यांच्या भक्तांमध्ये त्या जयाकिशोरी या नावाने ओळखल्या जातात.यांच्या प्रवचनांमधून भक्त अक्षरशः तल्लीन होऊन जातात.

जया किशोरी जी यांनी आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे.म्हणूनच जया किशोरी यांच्या प्रवचनांमधून जमा झालेला सर्व पैसा हा उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्ट ला दान केला जातो व तो अपंग व पिडीत लोकांच्या सेवेसाठी पुरवला जातो.इतक्या लहान वयामध्ये अध्यात्माची कास धरून त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणे हे निश्चितच आजच्या काळातील खूप मोठे सकारात्मकतेचे उदाहरण आहे.