Home » पुण्यातील बुधवार पेठेतील काही धक्कादायक तथ्य,कदाचित तुम्हालाही माहित नसेल…
Article

पुण्यातील बुधवार पेठेतील काही धक्कादायक तथ्य,कदाचित तुम्हालाही माहित नसेल…

पुणे तिथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते पुण्यामध्ये अनेक अशी महत्त्वपूर्ण स्थळे आहेत त्यांना ऐतिहासिक वारसा आहे.पुण्यातील ही स्थळं बघण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.पुण्यामध्ये अशीही काही ठिकाण आहेत जी नकारात्मक रीतीने प्रसिद्ध आहेत.त्यापैकीच एक स्थळ म्हणजे पुण्यातील बुधवार पेठ होय.पुण्यातील बुधवार पेठ रेड लाइट एरिया म्हणून ओळखले जाते.बुधवार पेठ म्हटल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावतात.पुण्यामध्ये बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायात संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या मुली या व्यवसायामध्ये येऊन पैसा कमावतात.

अनेकदा तर अल्पवयीन मुलींना सुद्धा या वेश्या व्यवसाय मध्ये ढकलले जाते.अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ओढणे हा एक प्रकारे गुन्हाच मानला जातो. यामुळे वर्षानुवर्षे बुधवारपेठेत चालणारा हा व्यवहार कायदेशीर आहे का हा प्रश्न नक्कीच पडतो व जर वैध नसेल तर या व्यवसायावर कायदेशीररित्या बंदी का घातली जात नाही हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. याबद्दल आज  आपण थोडी माहिती घेणार आहोत.

बुधवार पेठ मधील वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे की नाही या प्रश्न संदर्भात अनेक प्रकारचे कायदे आणि  योजना सुद्धा आखल्या गेल्या आहेत. मात्र या योजनांचे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत नाही.बुधवार पेठेवर  पोलिसांचे छापे पडले असतानही हा व्यवसाय इतकी वर्षे विनासायास चालू कसा आहे त्याला दोन कारणे आहेत.एक म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली  म्हणजे या व्यवसायामध्ये ओढल्या गेलेल्या मुली हा बहुतांश आपल्या आर्थिक परिस्थितीला सावरण्यासाठी या व्यवसायामध्ये उतरलेल्या असतात व दुसरे म्हणजे जर हा व्यवसायच राहिला नाही तर आपल्या लैंगिक विचारांचे शमन करण्याचा पुरुषांसाठीचा हा एकमेव मार्ग आहे अन्यथा समाजात स्वैराचार माजेल.

येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या साठी अनेक सामाजिक संस्था काम करताना दिसून येतात.महिलांचे आरोग्य,मासिक पाळी विषयी च्या समस्या ,लैंगिक आरोग्य याविषयी या महिलांचे समुपदेशन केले जाते.याव्यतिरिक्त देश व विदेशातील अनेक दानशूर व्यक्तिमत्वांनीही बुधवार पेठेतील महिलांच्या पुनर्वसनासाठी आत्तापर्यंत भरीव योगदान दिले आहे.बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर आले असता त्यांनी बुधवार पेठेतील महिलांसोबत त्यांच्या आयुष्याबद्दल बराच वेळ चर्चा केली होती व त्यानंतर त्यांनी या महिलांच्या विकासासाठी मोठा निधी सुद्धा दिला होता.