Home » “तुम्हाला एकच मुलगी का?”, हा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान…!
Article

“तुम्हाला एकच मुलगी का?”, हा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान…!

‘बोले तैसा चाले’ या वचनाचा प्रत्यय प्रत्यक्ष आयुष्यात देणारी खूप कमी व्यक्तीमत्व आपल्या आजुबाजूला दिसून येतात.राजकारण या क्षेत्रात तर दिलेला शब्द केवळ आश्वासन असतो असेच चित्र निर्माण झाले आहे मात्र या गर्दीत समाजाला उपदेश करण्याअगोदर स्वतः ही तत्व आचरणात आणणारे काही नेते आहेत .शरद पवार यांपैकी एक होय.शरद पवार यांना सुप्रिया सुळे या एकच कन्या आहेत यावरून त्यांना अनेकदा दुसरे अपत्य व‌ विशेषकरून मुलगा नाही म्हणून प्रश्न‌ विचारले जात असत.

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा या समजुतीने अनेक लोक त्यांना चितेला अग्नी देण्यासाठी मुलगा हवाच असे समजावत असत.मात्र जनतेला कुटुंब नियोजन करण्यास सांगण्याअगोदर आपण एकच मुल होऊ द्यायचं असे शरद पवार व त्यांच्या पत्नीने ठरवले होते.मुलगा व मुलगी असा भेद न करता दोघांनाही सक्षम केले‌ जाऊ शकते असा ठाम विश्वास शरद पवार यांना होता.सुप्रिया सुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी ठरू शकतात असा विश्वासही त्यांना होता.

शरद पवार यांना अनेक ठिकाणी मुलगा नसल्याबद्दल प्रश्न विचारले जात असत मात्र एकदा त्यांना दूरदर्शन वर मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारला होता तेव्हाही त्यांनी आपल्याला केवळ एक अपत्य व तेही मुलगी असल्याचा पश्चात्ताप होत नाही असे अगदी ठामपणे सांगितले होते.शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या राजकारणात शरद पवारांचा वारसा अतिशय प्रभावीपणे चालवत आहेत.