Home » ‘या’ ५ गोष्टी केल्यामुळे व्यक्ती नेहमी ठरतात आयुष्यामध्ये अयशस्वी, जाणून घ्या…!
Article Entertainment Fashion Travel

‘या’ ५ गोष्टी केल्यामुळे व्यक्ती नेहमी ठरतात आयुष्यामध्ये अयशस्वी, जाणून घ्या…!

आयुष्यामध्ये यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते .काहींच्या मते भौतिक सुख हे यशाचे मोजमाप करू शकणारे प्रमुख निकष आहे तर काहींच्या मध्ये भौतिक सुखापेक्षा ही मानवी समाधान आणि शांती यशाची मुख्य परिमाणे आहेत. अपयश मात्र केवळ एकाच व्याख्येमध्ये गणले जाऊ शकते ते म्हणजे आपल्या आयुष्यातील ध्येय किंवा उद्दिष्ट गाठण्या मध्ये कमतरता निर्माण होणे.अपयश का येते याची कारणमीमांसा केली असता अशी काही व्यक्ती वैशिष्ट्ये दिसून येतात त्यांच्यामुळेच व्यक्ती निश्चित अपयशी होऊ शकते .आज पण अशीच काही व्यक्तीवैशिष्ट्ये बघणार आहोत त्यांच्यामुळे व्यक्तीला अपयश मिळतेः

  1. जी व्यक्ती वेळेची कदर करू शकत नाही त्या व्यक्तीला नेहमीच अपयश मिळते. अपयशी व्यक्ती आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचा उपयोग करत नाही.अशा व्यक्ती नेहमी निरनिराळे संकल्प करतात मात्र हे संकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य तो वेळ कधी गुंतवत नाहीत. ज्या व्यक्तींना वेळेचे महत्त्व किंवा वेळेचे नियोजन करण्याची कला आली नाही ती व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच अपयशी राहते.
  2. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या उद्दिष्टांना प्राधान्य क्रमानुसार लावणे खूप आवश्यक असते जेणेकरून सर्वात जास्त महत्त्वाचे जे उद्दिष्ट आहे ते प्राधान्य क्रमामध्ये सर्वात वरती असावे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आणि शिस्तबद्धता असावी.जे उद्दिष्ट प्राधान्यक्रमांमध्ये शेवटी आहे त्याला पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्यक्रमा च्या तुलनेत कमी शिस्तबद्धता व प्रयत्न कमी करावे लागतात. अपयशी व्यक्तींना आपल्या आयुष्यातील नक्की कोणते उद्दिष्ट साध्य करायचे याचे नियोजन करता येत नाही व अशा व्यक्ती उत्पादकतेला असे फारसे महत्व देत नाहीत. यश मिळवण्यासाठी काही निवडक व महत्वपूर्ण कार्यांमध्ये आपली मेहनत गुंतवणे आवश्यक आहे.
  3. कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली किंवा एखाद्या कामांमध्ये आपल्याला रस नसेल तरीही त्या परिस्थितीवर मात करून आपले काम पूर्ण करण्यावर यशस्वी व्यक्ती भर देतात.आपले वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करत नाही ,एखादा विषय अभ्यासाला  आपल्याला आवडत नाही म्हणून त्या विषयांमध्ये प्रभूत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्या विषयाला टाळण्यावर अयशस्वी व्यक्ती भर देतात.
  4. अयशस्वी व्यक्ती या नेहमी स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजत असतात. अशा व्यक्ती स्वतः भोवती काही मर्यादा व सीमा आखून घेतात. अशा व्यक्तींना आपण केवळ काही  ठराविक व कमी प्रतिष्ठा असलेली कामे करू शकतो असे नेहमी सतावत असते. या व्यक्ती आपण अभ्यासामध्ये कमी पडतो, नोकरीच्या ठिकाणी दिलेला टास्क  पूर्ण करू शकत नाही किंवा खेळांमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही असे या कार्याला सुरुवात करण्याअगोदर स्वतः निश्चित करतात व त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न न करण्याचा एक प्रकारे बहाना शोधतात. स्वतःमध्ये काही मर्यादीत कौशल्य आहेत असे अगदी ठामपणे मनाशी धरतात व स्वतःमधील क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याचे नेहमीच टाळतात.
  5. अयशस्वी व्यक्ती या एखादे कार्य न करण्यासाठी विविध कारणे देत असतात.अयशस्वी व्यक्ती या वास्तवदर्शी नसतात. यशस्वी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने सर्वात आधी काम टाळण्यासाठी खोटे कारण देण्याचे टाळावे व त्याऐवजी आवश्यक ती मेहनत घ्यावी.
  6. अयशस्वी व्यक्तींना सामाजिक आयुष्यामध्ये वावरण्याची कौशल्य आत्मसात नसतात. सामाजिक आयुष्यामध्ये वावरतांना इतरांशी संवाद साधणे त्यांना कठीण जाते. इतरांशी प्रभावीपणे संवाद साधण्या मध्ये व आपल्या भावना व्यक्त करण्यामध्ये अयशस्वी व्यक्ती कमी पडतात. काही वेळा अयशस्वी व्यक्ती आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून उद्धटपणे वागतात.
  7. कयशस्वी व्यक्ती स्वप्न खूप मोठमोठे पाहतात मात्र ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे धैर्य दाखवत नाहीत.यशस्वी होण्यासाठी अ आपली उद्दिष्ट व स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणेही खूप गरजेचे असते.
  8. अपयशी व्यक्तिंना स्वतःचे असे कोणतेही मत नसते. कोणत्याही बाबतीमध्ये अशा व्यक्ती ठामपणे उभे राहू शकत नाही.अपयशी व्यक्ती वाचन करत नाहीत, स्वतःला नवनवीन कौशल्य यांच्याबाबतीत अपडेट ठेवत नाही. या व्यक्तींना इतरांच्या विचारांना सामावून घेणे जमत नाही. या व्यक्तींना स्वतःच्या विचारांच्या पलीकडे इतरांचे विचार स्वीकारार्ह वाटत नाही. त्यांना प्रत्येक व्यक्तीने आपल्या दृष्टिकोनातून  विचार करावा असे वाटते.