Home » आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्यावर सुनील शेट्टीने दिली ही प्रतिक्रिया…
Entertainment

आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्यावर सुनील शेट्टीने दिली ही प्रतिक्रिया…

क्रिकेटर केएल राहुलसोबत बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे नाव अनेकदा चर्चेत येते.रिपोर्ट्सनुसार,दोघेही रिलेशनशिप एन्जॉय करत आहेत.दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.अथिया शेट्टीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करून चाहत्यांना सांगितले की,ती सध्या इंग्लंडमध्ये आहे.केएल राहुलही कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. 

केएल राहुलने बीसीसीआयला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अथिया शेट्टीची जोडीदार म्हणून वर्णी लागल्याचेही सांगितले जात आहे,अशी प्रतिक्रिया सुनीलने दिली.नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीला अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

यासोबतच केएल राहुलला कंपनी देण्यासाठी अभिनेत्री खरंच इंग्लंडला गेली आहे का,असा प्रश्नही विचारण्यात आला होता. इ टाईम्सच्या वृत्तानुसार,सुनील शेट्टी यांनी या दोन्ही गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, “हे सर्व रिपोर्ट्स आहेत, माझ्याकडे या गोष्टींवर भाष्य करण्यासारखे काही नाही.”

सुनील शेट्टीने अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या नात्याबद्दल आणि ते इंग्लंडमध्ये एकत्र असल्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत पोस्ट शेअर करताना खूपच आरामात दिसत आहेत.अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अथिया शेट्टी नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात दिसली होती.हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘होम सोलो’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.