Home » आर्यन खान बनला होता अवघ्या पंधराव्या वर्षी पिता,खुद्द शाहरुखने केला या सत्याचा खुलासा…
Entertainment

आर्यन खान बनला होता अवघ्या पंधराव्या वर्षी पिता,खुद्द शाहरुखने केला या सत्याचा खुलासा…

आर्यन खान हे नाव सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले आहे.आर्यन खान हा बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान चा मुलगा असून काही महिन्यांपूर्वी कथित अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले होते व त्याला 26 दिवसांचा तुरुंगवासही झाला होता. सध्या आर्यन जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खानला एका आलिशान क्रूज वर अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पकडण्यात आले होते.आर्यन खानच्या अटकेनंतर तो प्रसारमाध्यमांच्या आजतागायत चर्चेचा विषय ठरलेला आहे.

हे पहिल्यांदाच नाही कि आर्यन खान हा बातम्यांच्या झोतात आला आहे या अगोदरही अनेकदा आर्यन खान विषयी बऱ्याच चर्चा रंगत होत्या.या चर्चा आर्यन बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा असल्यामुळे होत्या. शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडीओ मध्ये शाहरुख खान आर्यन खान विषयीचे एक सत्य स्वतः सांगत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरूखने असे म्हटले आहे की आर्यन खान हा वयाच्या पंधराव्या वर्षीच पिता बनला आहे.आर्यन खानचा मुलगा कोण आहे व  शाहरुखने आपल्या मुलाविषयी असे वक्तव्य का केले याची सर्वांना उत्सुकता वाटू लागली.

या व्हिडिओमध्ये आपला सर्वात छोटा मुलगा अबराम हा आर्यन चा मुलगा असल्याचे शाहरुख ने सांगितले.शाहरूखने असे वक्तव्य का केले तर शाहरूख आणि गौरी खान ला तीन मुले आहेत.त्यांपैकी सर्वात छोटा मुलगा अबराम ज्यावेळी सरोगसीद्वारे जन्मला त्यावेळी सर्वत्र अशा बातम्या प्रसारित होऊ लागल्या की हा मुलगा शाहरुख चा मोठा मुलगा आर्यन खानचा आहे. त्यावेळी आर्यन खान हा अवघ्या पंधरा वर्षांचा होता.

शाहरुख आणि गौरी ने अबरामला सरोगसीद्वारे जन्म दिला आहे.शाहरूखने या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की त्यावेळी अशा बातम्या प्रसारित करणाऱ्या लोकांनी पंधरा वर्षाच्या मुलावर या बातम्यांचा काय परिणाम होईल याचा जराही विचार केला नव्हता.व या बातम्यांचा खूप मोठा परिणाम आर्यन वर झाला होता.याच काळामध्ये आर्यन खान चा एका परदेशी मुलीसोबत चा एम एम एस ही एडिट करून सर्वत्र प्रसारित केला गेला होता.