Home » आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी या दोघांमध्ये आहे अनोखे नाते…!
Entertainment

आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी या दोघांमध्ये आहे अनोखे नाते…!

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटानंतर आलिया भट्ट चा सर्वत्र बोलबाला आहे.आलिया भट्ट ही खूप कमी कालावधीमध्ये बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलेली अभिनेत्री पैकी एक मानले जाते.आलिया भट्ट प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे व तिच्यावर अनेकदा नेपोटिझमचा आरोपही केला जातो.मात्र आलिया ने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने स्वतःची क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

आपल्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीमध्ये आलियाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.आलिया भट्ट व्यावसायिक आयुष्या प्रमानणे वैयक्तिक आयुष्याबद्दल ही चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरत आहे.रणबीर कपूर कपूर या कपूर खानदानाच्या सुपुत्राला सध्या आलिया डेट करत आहे व लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत अशा बातम्या सुद्धा येत आहे.मात्र रणबीर पेक्षा सुद्धा एका अन्य अभिनेत्यासोबत सध्या आलियाचे नाव जोडले जात आहे व हा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी होय.

इम्रान हाश्मी आणि आलिया भट्ट या दोघांमध्ये एक अनोखे नाते आहे जे आत्तापर्यंत समोर आले नव्हते.अभिनेता इमरान हाश्मी हा महेश भट्ट यांचा भाचा आहे व या नात्याने आलिया आणि इम्रान हे भाऊबहीण आहेत.आलिया आणि इम्रान हे कौटुंबिक नातेसंबंधामुळे एकमेकांशी खूप जवळकीचे संबंध राखून आहेत.इम्रान हाश्मी हासुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे.त्याला सिरिअल किसर म्हणूनही ओळखले जाते.पडद्यावर अनेक बोल्ड सीन देणारा इम्रान प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र अतिशय शामळू असल्याचे त्याची पत्नी सांगते.