Home » इरफान खानची ही अंतिम इच्छा राहिली अपूर्ण…
Entertainment

इरफान खानची ही अंतिम इच्छा राहिली अपूर्ण…

काही कलाकार असे असतात जे केवळ त्यांच्या अभिनयामुळे आपल्या सोबत जोडले जात नाही तर ते आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी घट्ट बसलेले असतात.या कलाकारांच्या भूमिका म्हणजे आपल्या भावनांना स्पर्श करणारा क्षण असतो.असाच एक कलाकार म्हणजे दिवंगत इरफान खान होय.इरफान खान हा कलाकार प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने गुंतवून ठेवणारा अवलिया होता.29 एप्रिल 2020 रोजी इरफान खान चे कॅन्सरने निधन झाले.

इरफान खान च्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला पोकळी निर्माण झाल्याच्या भावनेने व्यापून टाकले.इरफानचा सात जानेवारीला वाढदिवस असतो.यानिमित्ताने त्याच्या काही अपूर्ण इच्छा निकटवर्तीयांनी समोर ठेवल्या आहेत.त्यापैकी एक इच्छा म्हणजे विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या रायशी निगडित आहे.ही इच्छा नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊ या.

इरफान खानने खूप कठीण परिस्थितीमध्ये बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण तर केलेच पण हॉलीवूड मध्ये सुद्धा आपल्या कामाची दखल घ्यायला लावली.एकेकाळी त्याच्या कडे ज्युरासिक पार्क बघण्यासाठी पैसे नव्हते मात्र जुरासिक वर्ल्ड चित्रपटामध्ये त्याने पुढे जाऊन भूमिका केली व त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले.इरफानने आपल्या आयुष्यामध्ये पैसा व प्रसिद्धी मिळवली मात्र त्यांची एक इच्छा अपूर्णच राहिली.

ती इच्छा नेमकी काय होती तर जज्बा या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी इरफान खान आणि ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ आहे. यामध्ये इरफान खानला असा प्रश्न विचारण्यात आला होता की त्याला कोणासोबत रोमँटिक भूमिका करण्यास आवडेल.त्या वेळी त्याने त्याला आयुष्यात एकदा तरी ऐश्वर्या सोबत चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका करण्याची खूप इच्छा आहे.यानंतर इरफान यांचे अकाली निधन झाले व त्याची ऐश्वर्या सोबत नायकाची भूमिका साकारण्याची इच्छा अपूर्णच राहिली.