Home » एयरपोर्ट वर हरवला जूही चावलाचा डायमंड चा झुमका, सापडून आणणाऱ्याला मिळणार हे खास बक्षीस
Entertainment

एयरपोर्ट वर हरवला जूही चावलाचा डायमंड चा झुमका, सापडून आणणाऱ्याला मिळणार हे खास बक्षीस

रोजच्या वापरातील काही गोष्टीं सोबत आपले खूप अनोखे  असे नाते बनते. या वस्तू निर्जीव असल्या तरीही त्यांच्याशी आपली भावनिक गुंतागुंत झालेली असते व त्यामुळे या  वस्तूंना अन्य पर्याय उपलब्ध असले तरीही ती वस्तू वापरण्यावर च आपण भर देतो जसे की एखाद्या विशिष्ट ड्रेस किंवा ज्वेलरी इत्यादी होय. अगदी सर्वसामान्य माणसांप्रमाणे सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील काही वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व असते.

मग या वस्तू पुढे अन्य कितीही महागड्या वस्तू खरेदी केल्या तरीही त्याला मोल नाही. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला च्या बाबतीत घडला आहे. जुही चावला रोज एक डायमंड चे कानातले वापरत असते. गेल्या पंधरा वर्षांपासून हे कानातले तिने जपुन ठेवले होते व रोज हे कानातले घालत असे.मात्र नुकताच दिल्ली येथील विमानतळावर इमिग्रेशन च्या तपासणीच्या वेळी तिचे हे कानातले हरवले व खूप शोधूनही ते सापडले नाही .

हे कानातले आपल्या हृदयाच्या खूपच जवळचे होते असे तिचे म्हणणे आहे.हे विशेष कानातले शोधण्यासाठी चाहत्यांनी आपल्याला मदत करावी म्हणजे हे कानातलेआढळून आले तर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी व कोणी हे कानातले शोधून देण्यामध्ये आपली मदत केली तर त्यांना आपण खूप चांगले  बक्षीस देऊन त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सन्मान करू असे आवाहन जुहीने आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

जुही ने केलेल्या त्या ट्विटला चाहत्यांकडून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या.काही दिवसांपूर्वीच या विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा वरही जुहीने टीका केली असून खूप जास्त वेळ प्रवाशांना तपासणीसाठी ताटकळत ठेवले व आपल्या कामांमध्ये दिरंगाई केल्याचा आरोपही जुहीने या विमानतळावरील अधिकाऱ्यांवर केला आहे.