Home » ऐश्वर्या,करिष्मा नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती जया बच्चनला सून‌ म्हणून पसंत…!
Entertainment

ऐश्वर्या,करिष्मा नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती जया बच्चनला सून‌ म्हणून पसंत…!

बॉलीवूड मध्ये फिल्मी पार्श्वभूमी असेल तर अतिशय सहजपणे प्रवेश मिळू शकतो असे अनेकदा सिद्ध झाले आहे.यावरूनच नेपोटिझमचा आरोपही केला जातो.बॉलीवूड मधील कपूर,बच्चन,देवगण खान या घराण्याचे वर्चस्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.बच्चन कुटुंबियांनी सुद्धा आपला मुलगा अभिषेक याला अतिशय बिग बजेट व मोठ्या बॅनरच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉंच केले.मात्र अभिषेक बच्चन चित्रपट सृष्टीमध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही.

सध्या तो त्याच्या पत्नी ऐश्वर्या राय मुळे व आई वडिलांमुळे जास्त ओळखला जातो.अभिषेक बच्चन चे नाव ऐश्वर्या राय चे अगोदर करिष्मा कपूर सोबत जोडले गेले होते.हे दोघे जण खूप दीर्घकाळ एकमेकांसोबत प्रेमसंबंधांमध्ये होते व दोघांचा साखरपुडाही झाला होता मात्र ऐन वेळी हा साखरपुडा मोडला.या नंतर जया बच्चन यांनी अभिषेक साठी एक मुलगी पसंत केली होती जी स्वतः एक प्रतिथयश अभिनेत्री आहे.

ही मुलगी म्हणजेच राणी मुखर्जी होय.राणी मुखर्जी आणि अभिषेकने युवा आणि बंटी और बबली या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते व पडद्याप्रमाणे ऑफ स्क्रीन सुद्धा या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती व हे दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याचेही बातम्या येत होत्या.राणी मुखर्जी जया बच्चन ला सुद्धा आपली सून म्हणून खूप पसंत होती.मात्र लागा चुनरी मे दाग या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी या दोघींमध्ये काही मतभेद निर्माण झाले व त्याचे पर्यावसन वादांमध्ये झाले.

यामुळेच जया बच्चन ने राणी मुखर्जीला आपली सून करण्याचे स्वप्न सोडून दिले व तिच्या बद्दल काही उणीदुणी काढली.यामुळे राणी मुखर्जीने नाराज होऊन काही दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.यानंतर अभिषेक बच्चननेही आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे राणी मुखर्जी पासून दूर राहणे पसंत केले.अशाप्रकारे जया बच्चन यांच्याशी वाद करणे हे राणी मुखर्जीला अभिषेक बच्चन ची पत्नी होण्यापासून रोखणारे ठरले.