Home » ऐश्वर्या-कतरीना नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते सलमान खानला लग्न…
Entertainment

ऐश्वर्या-कतरीना नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते सलमान खानला लग्न…

सलमान‌ खान‌ हा बॉलीवूड मधील मोस्ट एलिजिबल बॅचलर पैकी एक मानला जातो.सलमान सध्या 58 वर्षे वयाचा असून तो अविवाहित आहे.सलमानने आपल्या नावाचा जणूकाही ब्रांडच बॉलिवूडमध्ये तयार केला आहे.आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट सलमानने दिले आहे व तो करत असलेल्या सामाजिक कार्याची सुद्धा नेहमीच दखल घेतली जाते.आपले सामाजिक कार्य व चित्रपटांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्य मध्ये सुद्धा सलमान  खूपच चर्चेत असतो आणि सलमान कधी लग्न करणार हा प्रश्न त्याला नेहमी विचारला जातो.आतापर्यंत सलमानच्या आयुष्यात अनेक मूर्ती आल्या आहेत तरीही तो अद्यापही अविवाहित आहे या मागचे कारण सुद्धा अनेकांना बुचकळ्यात पाडते.

सलमानने अनेक अभिनेत्री व मॉडेल्सना डेट केले आहे.यापैकी ऐश्वर्या राय सोबत सलमानचे संबंध हे खूप जास्त जवळचे मानले जातात.ऐश्वर्या राय हेच त्याचे खरे प्रेम होते असे अनेक जण मानतात.मात्र सध्या सलमान खान चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये आपले पहिले प्रेम अभिनेत्री रेखा होती असे सलमान सांगतो.या व्हिडिओमध्ये सलमानने रेखा बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.त्या गोष्टी ऐकल्या हे कळून जाते की रेखा हेच सलमान चे पहिले प्रेम होते.

सलमानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ बीग बॉसच्या शोदरम्यानचा आहे.या व्हिडिओमध्ये सलमान खान असे सांगत आहे की लहानपणापासून रेखा जींवर त्याचे खूप प्रेम आहे व त्याच्या त्या क्रश आहेत.खूप लहानपणापासून तो रेखाजीं साठी अक्षरशः वेडा आहे व त्याने लहानपणी असे ठरवून टाकले होते की मोठे झाल्यावर आपण रेखाजींसोबत लग्न करू.लहानपणी रेखा यांची एक झलक पहायला मिळावी म्हणून त्या सकाळी फिरायला जात त्यावेळी सलमान त्यांची वाट बघत असे.सलमानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

रेखा जी या बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत व ऐंशीच्या दशकातील सुपरहिट  चित्रपटांमध्ये त्या हमखास असायच्या.आजही रेखाजी यांच्या नावाला एक प्रकारचे ग्लॅमरचं वलय आहे.रेखा जी यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले मात्र आजही त्या एकटेपणाने आपले आयुष्य व्यतीत करत आहेत.