Home » ‘कुछ कुछ होता है’ मधील राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद दिसते खूपच ग्लॅमरस,फोटो पाहून…
Entertainment

‘कुछ कुछ होता है’ मधील राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद दिसते खूपच ग्लॅमरस,फोटो पाहून…

करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल.१९९८ मध्ये आलेल्या या चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले होते.हा चित्रपट शाहरुख खान,काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातील त्रिकोणी प्रेमकथा आहे.या चित्रपटातील तिन्ही स्टार्सचे काम लोकांना खुप आवडले,पण सर्वाधिक लोकप्रियता चित्रपटात राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सना सईदने मिळवली.या चित्रपटात छोट्या अंजलीच्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकणारी सना सईद आता मोठी झाली आहे.तिचा लेटेस्ट फोटो बघितल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात निरागस दिसणारी छोटी अंजली म्हणजे सना सईद आता मोठी झाली आहे.सना सईद सोशल मीडियावर नेहमी खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करतांना दिसते.सना सईद ३३ वर्षांची झाली आहे,मात्र तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही ही खेदाची बाब आहे.ती काही चित्रपटांव्यतिरिक्त,डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती,परंतु असे असूनही तीला अपेक्षित यश मिळाले नाही.

समोर आलेल्या सना सईदच्या ताज्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या शॉर्ट टॉप आणि पॅन्टमध्ये दिसू शकते.या फोटोमध्ये तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे.फोटोमध्ये,खांद्याच्या लांबीचे केस तिला खूप शोभत आहेत.ती तीच छोटी अंजली आता खूप बदलली आहे तिला पाहून बहुतेकांना ती ओळखणार सुद्धा नाही.