Home » ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा घेतो इतक्या कोटींचे मानधन,आकडा ऐकून व्हाल थक्क…!
Entertainment

‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा घेतो इतक्या कोटींचे मानधन,आकडा ऐकून व्हाल थक्क…!

टेलिव्हिजन जगतातील सेलिब्रिटीज मध्ये कपिल शर्मा हे नाव अगदी लोकप्रिय झाले आहे.कपिल शर्मा हा एक आघाडीचा कॉमेडियन असून कपिल शर्मा शो मधून त्याने प्रचंड पैसाही कमावला आहे.त्यामुळे सध्या तो खूप ऐशो आरामाचे जीवन जगत आहे.मात्र सुरुवातीच्या काळात कपिलचे आयुष्य इतके सुकर नव्हते.सुरवातीच्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी व स्थिरस्थावर होण्यासाठी कपिलला खूप संघर्ष करावा लागला.

कपिल शर्माच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचे वडील जितेंद्रकुमार हे पंजाब पोलीस मध्ये हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.त्यांची आई जानकी राणी या गृहिणी होत्या.कपिलला एक बहीण सुद्धा होती मात्र तिचे कॅन्सरमुळे निधन झाले.कपिलचा भाऊ सुद्धा पंजाब पोलीस मध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करतो. 

२०१५ साली कपिल शर्माने गिन्नी चतरथ यांच्यासोबत विवाह केला.कपिल आणि गिन्नीला दोन मुले सुद्धा आहेत.कपिलच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कपिलने २००७ साली सर्वात प्रथम टेलिव्हिजनवर पाऊल ठेवले.२००७ साली कपिल ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामध्ये तो सहभागी झाला होता व या ठिकाणी विजेता म्हणून दहा लाखाचे बक्षीस सुद्धा त्याने जिंकले होते.

या शो नंतर कपिलला पंजाब मधील एका लोकल कॉमेडी शो मध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली.असेच काही छोटे-मोठे शो कपिलने आपल्या करिअरच्या सुरुवातीला केले.मात्र २०१३ साली कपिलने आपल्या व्यावसायिक आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व स्वतःचा शो निर्माण केला.’कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा शो टेलिव्हिजन मधील सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा शो ठरला आहे.या शो नंतर कपिल शर्मा हा बॉलीवूड मध्ये सुद्धा कॉमेडी किंग या नावाने ओळखला जाऊ लागला.

अनेक सुपरस्टार आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा चे शोला पसंती देऊ लागले.या शोमुळे केवळ कपिल ला ओळखच नव्हे तर पैसा व प्रसिद्धी सुद्धा खूप मिळाली.या शो नंतर कपिल चे मानधन सुद्धा वाढले.आज घडीला कपिल शर्मा वर्षाला तीस कोटी रुपये इतके मानधन घेतो व त्याचे एकूण संपत्तीचे मुल्य हे जवळपास १७० कोटी रुपये इतके आहे.कपिलचा पंजाब मध्ये एक मोठा आलिशान बंगला आहे.

याची किंमत पंचवीस कोटी रुपये असून त्याच्याकडे आलिशान गाड्यांचा जणूकाही ताफाच आहे.कपिल शर्माकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे.हि व्हॅनिटी व्हॅन कपिलने खास स्वतःसाठी बनवून घेतली आहे.या व्हॅनिटी व्हॅन ची किंमत सहा कोटी रुपये आहे.या व्हॅनिटी व्हॅनची चर्चा सुद्धा सर्वत्र खूप रंगली होती.कपिल शर्मा हे नाव सध्या केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशात सुद्धा खूप गाजले आहे व परदेशात सुद्धा कपिलचे अनेक शो होतात.