Home » कोण होती गंगूबाई काठियावाडी,जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही तथ्य…!
Entertainment

कोण होती गंगूबाई काठियावाडी,जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही तथ्य…!

बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट ही निर्माता व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.या चित्रपटाचा एक दमदार टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे.चित्रपटातील गंगुबाई काठीयावाडी या भूमिकेतील आलियाचा लूक प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस आला आहे व या चित्रपटाची सर्वत्र एकच चर्चा आहे.मात्र या चित्रपटाची कथा ज्या गंगुबाई काठीयावाडी च्या जीवनावर आधारित आहे ती गंगुबाई काठियावाडी कोण होती हे आज आपण जाणून घेणार आहोत.

एस हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकामध्ये गंगुबाई काठीयावाडी बद्दल बरीचशी माहिती देण्यात आली आहे.या पुस्तकाच्या माहितीच्या आधारे गंगुबाई काठीयावाडी ही गुजरात मधील राहणारी होती.काठियावाडमध्ये राहणारी असल्यामुळे तिला काठीयावाडी हे नाव मिळाले.खूप लहान वयामध्ये गंगुबाई ला परिस्थितीने वेश्यावृत्ति मध्ये ढकलले गेले व नंतरच्या काळामध्ये अनेक अट्टल गुन्हेगार हे तिचे ग्राहक बनले.गंगूबाईचे पूर्ण नाव गंगुबाई हरजीवनदास काठियावाडी असे होते.गंगुबाई ही कामाठीपुरा या भागामध्ये आपला वेश्याव्यवसाय चालत असे व तिने वेश्यांसाठी व त्यांच्या मुलांसाठी खुप कल्याणकारी काम केले.

वेश्याव्यवसायात येण्याअगोदर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती.सोळा वर्षांची असताना गंगुबाई ला तिच्या वडिलांकडे अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती बद्दल प्रेम निर्माण झाले व तिने पळून जाऊन त्याच्या सोबत लग्न केले आणि मुंबईत येऊन राहू लागली. मात्र या अकाउंटंटने तिच्यासोबत फसवणूक केली व तिला पाचशे रुपयांना  विकले.वेश्या व्यवसाय मध्ये आल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध डॉन क्रीम लालाच्या टोळीतील एका गुंडाने तिच्यावर बलात्कार केला होता.

यावेळी गंगुबाईने त्वेषाने पेटून उठून या अत्याचाराविरुद्ध लढा दिला व करीम लालाला तिने राखी बांधली. करीम लाला ची बहीण झाल्यानंतर कामाठीपुरा व्यवसायाची सूत्रे तिच्या हातात आली.या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवत असताना गंगुबाई अशाच मुलींना किंवा महिलांना या ठिकाणी व्यवसायामध्ये घेत असे ज्या स्वतःच्या मर्जीने येथे येत असत.गंगुबाई काठीयावाडी जणू काही एक लेडी डॉन बनली होती.संजय लीला भन्साळी यांनी गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाची निर्मिती केल्यापासूनच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.या चित्रपटामध्ये आलिया भट गंगुबाई काठियावाडी पडद्यावर जिवंत करण्यास कितपत यशस्वी ठरते हे पाहणे रंजक ठरेल.