Home » गंगुबाई कठियावडी यांनी चक्क पंडित जवाहरलाल नेहरू यांना घातली होती लग्नाची मागणी…!
Entertainment

गंगुबाई कठियावडी यांनी चक्क पंडित जवाहरलाल नेहरू यांना घातली होती लग्नाची मागणी…!

जय लीला भन्साळी दिग्दर्शित काठीयावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.हा चित्रपटएस हुसैन जैदी यांचे पुस्तक ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई यांच्या पुस्तकावर आधारित आहे.गंगुबाई काठियावाडीचा व्यक्तिमत्वामुळे केवळ सामान्य नव्हे तर राजकारणातील लोकही प्रभावित होते.महिला सक्षमीकरणाच्या परिषदेमध्ये वेश्याव्यवसाय या विषयावर प्रभावी भाषण केले होते.

यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत गंगूबाई यांचे नाव पोहोचले होते.या काळामध्ये गंगुबाई यांनी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना लग्नासाठी मागणी घातली होती.आज आपण या संदर्भातील किस्सा जाणून घेऊया.कामाठीपुरा मध्ये असे एकही घर नव्हते जिथे गंगुबाई काठीयावाडी चा फोटो लावला नाही.कारण या भागातील वेश्यांसाठी त्यांनी खूप काम केले.गुजरात मधील एका धनाढ्य कुटूंबातील गंगुबाई मुंबईत अभिनेत्री होण्याच्या इच्छेने आल्यावर त्यांची फसवणूक झाली.

वडिलांकडे असलेल्या अकाउंटंट रमनिकलाल च्या प्रेमात पडून त्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मुंबईला पळून आल्या.या ठिकाणी त्यांच्या प्रियकराने 500 रुपयांमध्ये विकले.त्याचवेळी त्यांनी असे ठरवले होते की यापुढील आयुष्यात कोणत्याही अन्य मूलीला मर्जी विरूध्द या व्यवसायामध्ये पडू द्यायचे नाही.गंगुबाई कडे अनेक गॅंगस्टर येत असत.मुंबईतील सर्वात मोठा गुंड क्रीम लावावा त्यांनी आपला भाऊ मानले होते.महिला सक्षमीकरणाच्या एका परिषदेमध्ये गंगुबाईने शहरी भागातील वेश्या वास्तवावर भाष्य केले होते व याठिकाणी वेश्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी काय बदल केले जावेत या संदर्भातील मार्गदर्शन केले होते.

या भाषणाची चर्चा पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यत गेली होती.या भाषणामुळे ते चांगलेच प्रभावित झाले होते.एकदा गंगुबाई यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी संधी मिळाली.त्यावेळी या भेटीदरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुम्ही हा व्यवसाय का निवडला यापेक्षा एखादा चांगला पती निवडून लग्न करू शकल्या असत्या असे म्हटले.यावर गंगुबाई नि पंडित जवाहरलाल नेहरूंना मला मिसेस नेहरू बनवाल का असा प्रश्न केला.या प्रश्नाचे उत्तर जवाहरलाल नेहरूंकडे नव्हते.यावर गंगुबाईने असे म्हटले की उपदेश करणे खूप सोपे असते मात्र प्रत्यक्षात ते अमलात आणणे खूप अवघड असते.