Home » चक्क अमिर खानने केजीएफ सुपरस्टार यशची मागितली वारंवार माफी…
Entertainment

चक्क अमिर खानने केजीएफ सुपरस्टार यशची मागितली वारंवार माफी…

बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.अलीकडेच आमिर खानने त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. पुढील वर्षी १४ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.या चित्रपटात आमिर अभिनेत्री करीना कपूरसोबत दिसणार आहे.चाहत्यांना या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे, मात्र आमिर खानच्या या चित्रपटासोबतच साऊथ सुपरस्टार यशचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘KGF 2’ देखील प्रदर्शित होणार आहे.

आमिरने माफी मागितली…

अशा परिस्थितीत पुढील वर्षी १४ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.मात्र, या भांडणामुळे आमिर खानने आता ‘KGF 2’चे निर्माते आणि अभिनेता यश यांची माफी मागितली आहे. एका वृत्तानुसार, आमिर खानने त्याच्या ताज्या मुलाखतीत ‘KGF’चे निर्माते आणि अभिनेता यश यांची १४ एप्रिल रोजी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित केल्याबद्दल माफी मागितली आहे.

आमीर खानने सांगितले की आमचा चित्रपट व्हिज्युअल इफेक्ट्समुळे उशीर झाला आहे.आमच्याकडे दोन पर्याय आहेत एकतर आम्ही घाईत चित्रपट प्रदर्शित करणे किंवा दर्जेदार काम करून चित्रपट प्रदर्शित करणे आणि मला घाई अजिबात आवडत नाही. म्हणूनच आम्ही दुसरा पर्याय घेऊन आलो आहोत. म्हणूनच यशचा ‘KGF 2’ ज्या दिवशी रिलीज होत आहे त्याच दिवशी आम्हाला ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज करणे भाग पडले आहे.

‘KGF 2’ च्या प्रमोशनसाठी आमिर खानने देखील खुलासा केला की त्याला ‘KGF 2’ सोबत आपला चित्रपट रिलीज केल्याबद्दल पश्चाताप होत आहे. अशा परिस्थितीत त्याने ‘KGF 2’ च्या टीमसोबत यशच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा करार केला आहे.

अभिनेत्याने सांगितले की,मी माझा चित्रपट कधीच इतरांच्या चित्रपटांसह प्रदर्शित करत नाही.मला इतरांची जागा घ्यायला आवडत नाही.पण हेही खरे आहे की ‘लाल सिंग चड्ढा’च्या माध्यमातून मी पहिल्यांदाच पडद्यावर शीख व्यक्तिरेखा साकारत आहे आणि त्यामुळेच मला बैसाखीपेक्षा चांगली रिलीज डेट मिळू शकत नाही.