Home » ड्रिम गर्ल हेमामालिनी यांना अभिषेक बच्चनला बनवायचे होते जावई,परंतु ईशाने दिला होता ‘या’ कारणामुळे नकार …
Entertainment

ड्रिम गर्ल हेमामालिनी यांना अभिषेक बच्चनला बनवायचे होते जावई,परंतु ईशाने दिला होता ‘या’ कारणामुळे नकार …

हेमा मालिनी यांना आज सुद्धा ड्रीम गर्ल असे म्हटले जाते.हेमा मालिनी या त्यांच्या काळातील एक उत्कृष्ट नृत्यांगना व सौंदर्यवती होत्या.हेमामालिनी यांच्या सौंदर्याचे अनेक अभिनेते दिवाने होते व अनेकांनी त्यांच्यासमोर लग्नाचे प्रस्ताव सुद्धा ठेवले होते.जितेंद्र,संजीव कुमार या अभिनेत्यांना हेमामालिनी यांच्या सोबत विवाह करायचा होता.मात्र हेमामालिनी यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या सोबत लग्नाची गाठ बांधली.धर्मेंद्र यांनी ज्यावेळी हेमामालिनी यांच्या सोबत लग्न केले त्यावेळी त्यांचा पहिला विवाह झाला होता.

धर्मेंद्र यांच्या हेमामालिनी या दुसऱ्या पत्नी आहेत.हेमा मालिनी या अभिनयासोबतच राजकारणामध्ये सुद्धा आपला ठसा उमटवत आहेत.हेमा मालिनी व अमिताभ बच्चन हे खूप चांगले मित्र आहेत.या दोघांनी काही वर्षांपूर्वी ‘बागबान’ हा चित्रपट केला होता.या चित्रपटातील दोघांचाही अभिनय चित्रपट रसिकांना खूप भावला होता.अमिताभ आणि हेमामालिनी यांच्या कुटुंबीयांचे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खूप चांगले संबंध आहेत.

नुकतेच हेमामालीनी यांनी आपली मुलगी ईशा देओल बद्दल काही खुलासे केले आहे.त्यामध्ये तिने असे म्हटले आहे की अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक ला हेमामालिनीला आपला जावई बनवायची इच्छा होती.अभिषेक हा खूप संस्कारी मुलगा आहे व तो सर्वांचा आदर करतो.एका आईला आपल्या मुलीच्या पती मध्ये जे काही गुण हवे असतात ते सर्व गुण अभिषेक मध्ये आहेत म्हणून हेमा मालिनी यांना अभिषेक ला आपला जावई बनवायचे होते.

मात्र ज्यावेळी ईशाला या गोष्टीचा पत्ता लागला त्यावेळी तिने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये अभिषेक सोबत लग्नासाठी नकार दिला.अभिषेक बच्चनला नकार देण्यामागे ईशाने आपण अभिषेकला भाऊ मानत असल्याचे कारण दिले.ईशाने आपल्या बालपणीच्या मित्रासोबत भरत तख्तानीसोबत विवाह केला.या दोघांचेही दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते व अभिषेक ला नकार देण्यामागे हेच कारण असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.