Home » तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील भिडे मास्तरांची सोनू आता दिसते इतकी सुंदर,पाहून थक्क व्हाल
Entertainment

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील भिडे मास्तरांची सोनू आता दिसते इतकी सुंदर,पाहून थक्क व्हाल

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका दूरचित्रवाणीवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारी एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असून यातील प्रत्येक पात्र चाहतावर्गाशी भावनिक दृष्ट्या सुद्धा जोडला गेला आहे .या मालिकेतील पात्र साकारणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला एक वेगळीच ओळख सुद्धा मिळाली आहे. खूप कमी पात्र अशी आहेत जी सुरुवातीपासून एकाच अभिनेता किंवा अभिनेत्रीने निभावली आहेत कारण बदलत्या काळानुसार यातील काही अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी ही मालिका सोडली व त्या जागी नवीन कलाकारांची वर्णी लागली व त्या कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले .या मालिकेला सर्व स्तरातील चाहते आहेत. ज्या लोकांना विनोदी मालिका आवडतात ते तर या मालिकेचे खूप मोठे फँन आहेत कारण इतकी वर्षे ही मालिका सलगपणे प्रसारित होत असूनही याच्या प्रत्येक भागामध्ये एक प्रकारचे नावीन्य असते.

ही मालिका यशस्वी होण्यासाठी आणि प्रत्येक पात्र हुबेहूब साकारण्यासाठी प्रत्येक कलाकाराने अगदी जीवापाड मेहनत घेतली आहे व म्हणूनच ही पात्र अभिनय करत आहेत असे अजिबात वाटत नाही.त्यामुळे या मालिकेच्या यशस्वी होण्यामध्ये या मालिकेतील कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आज आपण या मालिकेतील अशाच एका बालकलाकार याबद्दल जाणून घेणार आहोत जी ही मालिका करत असताना मोठी झाली आहे.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू सेनामधील सर्वात अभ्यासू व समजूतदार मुलगी असलेली भिडे मास्तरांची कन्या सोनू अर्थातच झिल मेहता हिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. झिल आता खूप मोठी झाली असून तिचे सोशल मीडियावरील छायाचित्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.तरुणपणात आल्यावर सोनू अर्थात झिल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते आहे.

सौंदर्य आणि ग्लॅमरस लूक मुळे झिलचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत व यामुळे सोशल मीडियावर ती खूपच एक्टिव असते. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसाठी जेव्हा काम करण्यास सुरुवात केली तेव्हा तिचे वय अवघे तेरा वर्षे होते.भिडे मास्तरांची मुलगी सोनू या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले व ही भूमिका खूपच लोकप्रिय सुद्धा झाली होती. मात्र नंतरच्या काळामध्ये झिलला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते व संपूर्ण वेळ शिक्षणाला देण्यासाठी तिने या मालिकेतून ब्रेक घेतला व मुंबईतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे.