Home » दीपिका,प्रियांका किंवा शिल्पा नाही तर ‘या’ अभिनेत्रीची इंगजमेंट रिंग आहे सर्वात महागडी…
Entertainment

दीपिका,प्रियांका किंवा शिल्पा नाही तर ‘या’ अभिनेत्रीची इंगजमेंट रिंग आहे सर्वात महागडी…

बॉलीवूड सेलिब्रिटींचे आयुष्य नेहमीच चर्चेत असते,मग त्यांचे लग्न असो किंवा इंगजमेंट.या विवाहसोहळ्यांमध्ये एंगेजमेंट रिंगपासून वेडिंग लेहेंग्यापर्यंत मीडिया कव्हरेज उपलब्ध आहे. आज आपण अशीच एक बातमी बघणार आहोत ती म्हणजे अभिनेत्रींच्या एंगेजमेंट रिंग बद्दल आहे.जर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की, एंगेजमेंटमध्ये कोणत्या अभिनेत्रीला सर्वात महागडी अंगठी मिळाली,तर आपण आज त्या बद्दल जाणून घेणार आहोत की कोणत्या अभिनेत्रीची अंगठी सर्वात महागडी आहे.

१) करीना कपूर : २०१२ मध्ये करीना कपूर खानने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले.सैफ अली खानने करिनाला लग्नाच्या वेळी ५ कॅरेट प्लॅटिनम बँड असलेली हिऱ्याची अंगठी भेट दिली होती.मात्र,त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

२) ऐश्वर्या राय : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला सुमारे ५० लाखाची अंगठी दिली जी ५३-कॅरेट सॉलिटेअर रिंग होती.

३) प्रियांका चोप्रा : देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ साली ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले.यापूर्वी,एंगेजमेंटमध्ये,निकने प्रियांका चोप्राला हिऱ्याची मोठी अंगठी घातली होती,ज्याची किंमत $ २००,००० म्हणजे सुमारे १.४० कोटी रुपये आहे.

४) अनुष्का शर्मा : नुकतेच,लाडक्या मुलीचे पालक बनलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाले. अनुष्का शर्माने तिच्या एंगेजमेंटमध्ये १ कोटी रुपयांची अंगठी घातली होती.या वेडिंग रिंगची निवड स्वतः विराट कोहलीने केल्याचे बोलले जात आहे.

५) सोनम कपूर : सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले आहे.लग्नापूर्वी आनंद आहुजाने सोनम कपूरला सुमारे ९० लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी घातली होती.

६) शिल्पा शेट्टी : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही तिच्या एंगेजमेंटमध्ये खूप महागडी अंगठी घातली होती. बिझनेसमन राज कुंद्रा यांनी एंगेजमेंटमध्ये शिल्पाला २० कॅरेटची सॉलिटेअर अंगठी घातली,ज्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे.

७) दीपिका पदुकोण : २०१९ मध्ये दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले.दीपिकाने एंगेजमेंटमध्ये २.७ कोटी रुपयांची सिंगल सॉलिटेअर स्क्वेअर डायमंड रिंग घातली होती.

८) असिन थोट्टूमकल : आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘गजनी’ आणि दक्षिण भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री असीन थोट्टुमकलने २०१६ मध्ये बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केले. असिनने तिच्या एंगेजमेंटमध्ये ६ कोटी रुपयांची २० कॅरेटची सॉलिटेअर अंगठी घातली होती.असिन अशी एकमेव अभिनेत्री आहे जिची एंगेजमेंट रिंग सर्वात महागडी असल्याचे बोलले जाते.

९) कतरीना कैफ : नुकतेच विकी कौशल सोबत लग्न झालेली कतरीना कैफ हिच्या इंगजमेंट रिंगची सर्वत्र चर्चा झाली.ही रिंग प्लॅटिनम आणि हिऱ्याची असून तिची किंमत ७ लाख आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली.