Home » दुबईमध्ये आहे सलमान खानची सतरा वर्षाची मुलगी आणि पत्नी फोटो व्हायरल,सत्य ऐकून थक्क व्हाल…!
Entertainment

दुबईमध्ये आहे सलमान खानची सतरा वर्षाची मुलगी आणि पत्नी फोटो व्हायरल,सत्य ऐकून थक्क व्हाल…!

बॉलीवुड दबंग खान सलमान खान हा आपल्या अभिनयामुळे व शरीर यष्टी मुळे तरुणां प्रमाणे सर्वच वयोगटातील चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.आज सुद्धा अनेक मुली सलमान खान च्या प्रेमात वेड्या आहेत.सलमान खानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर मानले जाते.गेली अनेक वर्षे सलमानचे नाव विविध मॉडेल आणि अभिनेत्रींसोबत जोडले गेले व प्रत्येक वेळी त्याच्या लग्नाच्या अफवा सुद्धा पसरल्या.

मात्र अद्यापही सलमान अविवाहित आहे.सलमानच्या लग्नाबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता आहे म्हणूनच कोणत्याही मुलाखतीमध्ये सलमानला तू लग्न कधी करणार हा एक प्रश्न पत्रकारांकडून हमखास विचारला जातो.सलमान खान नुकताच दुबई दौऱ्यावर गेला होता.या ठिकाणी त्याची काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व या छायाचित्रांच्या प्रसिद्ध झाल्यानंतर असे सर्वत्र पसरवले गेले की सलमानचे दुबई येथे कुटुंब असून त्याची पत्नी व 17 वर्षांची मुलगी तिथे राहतात.

सलमानने आपली पत्नी व मुलीला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले आहे असेही सांगितले गेले.या छायाचित्रांमध्ये सलमान एका महिलेसोबत अतिशय हसत-खेळत गप्पा मारत असल्याचे दिसून येत आहे.मात्र ही महिला त्याची पत्नी नसल्याचे लवकरच उघड झाले व त्याने गुप्तपणे लग्न केल्याचे बातम्या या खोट्या असल्याचेही सिद्ध झाले.सलमान दुबई येथे गेले असता त्या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या या कुटुंबासोबत त्याने काही काळ व्यतीत केला होता तेव्हाची ही छायाचित्रे होती असे नंतर उघड झाले.