Home » ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील हा मोठा कलाकार घेणार मालिकेतून निरोप…
Entertainment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील हा मोठा कलाकार घेणार मालिकेतून निरोप…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे सर्वच वयोगटातील चाहते आहेत.तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका याच कारणामुळे आतापर्यंत सर्वाधिक टीआरपी देणारी गेल्या काही वर्षांमधील मालिका ठरली आहे.तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे यश यामध्ये भूमिका साकारणाऱ्या सर्वच कलाकारांवर अवलंबून होते.या मालिकेतील सर्व पात्र खूप लोकप्रिय झाली व या पात्रांना साकारणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष आयुष्यातही खूप प्रसिद्धी आणि पैसाही मिळाला.आज या कलाकारांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही.मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेला जणू काही ग्रहणच लागले आहे.

कारण एकापाठोपाठ एक या मालिकेतील विविध कलाकार ही मालिका सोडून जात आहेत.कलाकारांच्या अशा मालिका सोडून जाण्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांच्या अडचणींमध्ये चांगलीच भर पडली आहे.एक- दोन वर्षांपूर्वी याच मालिकेमध्ये दयाबेन ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी यांनी ही मालिका सोडून दिली.ही मालिका सोडण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारण दिले होते.दिशा वकानी यांनी मुलीला जन्म दिला होता व यामुळे त्यांना ही मालिका स्वतःहून सोडावी लागली.दयाबेन हे पात्र सुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका परदेशामधील भारतीयांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहे.आणि अनेक आठवडे टीआरपी मध्ये सर्वोच्च स्थानी राहिलेली ही मालिका आता मात्र एका मागोमाग एक लोकप्रिय कलाकारांच्या मालिका सोडून जाण्यामुळे टीआरपी मध्ये घसरण झाल्याचे दिसून येते.काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील अजून एक महत्त्वपूर्ण पात्र साकारणारे नटुकाका अर्थात घनश्याम नायक यांचे आजारामुळे दुःखद निधन झाले.नट्टूकाका हे पात्र त्यांनी अतिशय समरसून साकारले होते.नट्टू काकांचे फॅन फॉलोइंग खूप मोठे होते.

नट्टू काकांच्या पात्राची कमतरता या मालिकेमध्ये आत्तासुद्धा प्रेक्षकांना भासते.नटू काका यांच्या पाठोपाठ आता अजून एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा कलाकार या मालिकेतून निरोप घेणार आहे.हा कलाकार म्हणजे टप्पू चे पात्र साकारणारा अभिनेता राज उनादकट हा अभिनेता होय.राज मालिकेतील पुढील काही भागांचे चित्रीकरण झाल्यानंतर एक्झिट घेणार आहे.काही दिवसांपूर्वी राज आणि या मालिकेमध्ये बबीताजी चे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या व यावरून राजला वैयक्तिक आयुष्य मध्ये प्रचंड ट्रोल करण्यात आले होते हेच कारण आहे ज्यामुळे टप्पू हे पात्र आता या मालिकेचा निरोप घेणार आहे.यामुळे निश्चितच या मालिकेच्या टीआरपी मध्ये बदल घडून येतील.