Home » नर्गिस फाखरी नव्हे तर ही अभिनेत्री होती रॉक स्टार ची पहिली पसंती, ऐकून आश्चर्यचकित व्हाल
Celebrities Entertainment Movies Music News

नर्गिस फाखरी नव्हे तर ही अभिनेत्री होती रॉक स्टार ची पहिली पसंती, ऐकून आश्चर्यचकित व्हाल

इम्तियाज अली हे बॉलीवुड मध्ये नेहमीच नित्य नवे प्रयोग करणारे व वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्देशित करणारे निर्माते मानले जातात. इम्तियाज अलीचा रॉकस्टार हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटाला जवळपास नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांना एक नवीन ओळख मिळवून दिली गेली.

नर्गिस फाखरीचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामध्ये रणबीर आणि नर्गिस यांची केमिस्ट्री इतकी खुलली की प्रत्यक्ष जीवनातही या दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या चित्रपटातील आपली भूमिका नर्गिसने इतकी समरसून केली की जणूकाही ती भूमिका तिला पाहूनच बनवण्यात आली होती असे वाटावे .मात्र या चित्रपटासाठी पहिली पसंती नर्गिस नसून अन्य अभिनेत्री होती असे सांगितले तर नक्कीच आश्चर्य वाटेल व ही अन्य अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दीपिका पदुकोण होती.

इम्तियाज अलीने  यासंदर्भात खुलासा केला आहे.या चित्रपटासाठी दीपिकाला विचारणा केली होती त्यावेळी दीपिकाने बॉलिवूडमध्ये कोणताही चित्रपट केलेला नव्हता.ती मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होती. इमृतियाज या भूमिकेची ऑफर घेऊन जेव्हा दीपिका ला भेटायला गेला तेव्हा तो ठरवलेल्या हॉटेल मध्ये थांबला व पोर्चमध्ये दीपिकाची गाडी आली व त्यामधून जेव्हा ती उतरली त्यावेळी तिने त्याच्याकडे पहिल्याच भेटीत असा कटाक्ष टाकला की जणूकाही ती त्याला वर्षानुवर्षांपासून ओळखत आहे.

तिच्या त्या आत्मविश्वासाने निश्चितच इम्तियाज  खूप प्रभावित झाला होता मात्र या चित्रपटाच्या प्रत्यक्ष निर्मितीस  खूप वेळ लागल्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये दिपीकाने ही ऑफर नाकारली व त्या जागी नर्गिसची वर्णी लागली. दीपिकाने रॉकस्टार हा चित्रपट जरी इम्तियाज सोबत केला नसेल तरीही नंतरच्या काळामध्ये तमाशा,कॉकटेल यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये इम्तियाज आणि दीपिकाने एकत्र काम केले. दीपिका सध्या अनेक चित्रपटांवर काम करत असून यापैकी 83 या चित्रपटाची चांगली चर्चा आहे. 

जरी रॉकस्टार या चित्रपटामध्ये नर्गिसने प्रमुख भूमिका साकारली असेल तरीही आजही आपण आपल्या चित्रपटासाठी ची पहिली पसंती असलेल्या दीपिकासोबत ची ती पहिली भेट आणि तिचा तो कटाक्ष विसरू शकलेलो नाही हे इम्तियाजने आवर्जून सांगितले.