Home » निक जोनासने फॅमिली प्लॅनिंग बाबत उलगडले सत्य, प्रियांका कडून इतक्या मुलांची आहे अपेक्षा जाणून व्हाल थक्क…!
Entertainment

निक जोनासने फॅमिली प्लॅनिंग बाबत उलगडले सत्य, प्रियांका कडून इतक्या मुलांची आहे अपेक्षा जाणून व्हाल थक्क…!

लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.हार्दिक पांड्या ,अनुष्का शर्मा_ विराट कोहली ,श्लोका अंबानी ,करीना कपूर या सर्वांनीच चाहत्यांना आपल्या कुटुंबा मध्ये एका चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे गुड न्यूज दिली.या नंतर प्रसारमाध्यमांची नजर बॉलीवूड मधील गेल्या काही वर्षांमध्ये विवाहित झालेल्या सेलिब्रिटींच्या फॅमिली प्लॅनिंग वर वळली नसती तर नवलच .

यामध्ये दीपिका पदुकोण, प्रियांका चोपडा या अभिनेत्रींना त्या कधी गुड न्यूज देणार अशी वारंवार विचारणा प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांकडून केली जाते व त्यांच्या गर्भवती राहण्याबद्दल अनेक तर्कवितर्क ही लावले जातात.बॉलीवूड पासून हॉलीवुड पर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याची कमाल दाखवणाऱ्या प्रियंका चोपडा चे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असते .यामध्ये तिच्या पती निक जोनाससोबत तिचे व्हिडिओज आणि छायाचित्रे सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नेहमीच विविध कार्यक्रमांना व दौऱ्यावर सोबतच दिसत असतात. निक जोनासला नुकतेच एका मुलाखतीमध्ये फॅमिली प्लॅनिंग बद्दल विचारले गेले असता त्याने आपल्या पत्नी प्रियांका पासून आपल्याला एक दोन नव्हे तर खूप सारी मुले हवी आहेत व मला प्रियांका सोबत खूप मोठे कुटुंब बनवायचे आहे व या विचाराबाबत आपण गंभीर असल्याचे त्याने सांगितले.

प्रियांका आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग आहे व प्रियांका सोबत आयुष्य सुरू केल्यानंतर मला अशाच प्रकारचे आयुष्य हवे होते याची जाणीव वेळोवेळी होते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रियांकाला सुद्धा गोड बातमी कधी देणार असा प्रश्न विचारला असता तिने सुद्धा तिला एक दोन नव्हे तर खूप मुले हवी आहेत असेच उत्तर दिले होते. प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत पती निक जोनाससोबत स्थायिक असून ती तिचा शेवटचा चित्रपट द व्हाईट टायगर मध्ये राजकुमार राव सोबत दिसली होती. सध्या ती आपल्या कामांमध्ये व्यस्त असून तिच्या हातात बॉलीवूड प्रमाणेच आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुद्धा आहेत.