Home » ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधील अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच चढणार बोहल्यावर… 
Entertainment

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधील अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच चढणार बोहल्यावर… 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन गेल्या साडेतीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.अलीकडेच एका दिवाळी पार्टीत दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते,ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता बातमी येत आहे की अंकिता लोखंडे डिसेंबरमध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.या जोडप्याच्या लग्नाचे आमंत्रण लवकरच जवळच्या लोकांना आणि मित्रांना पाठवले जाईल.

या लग्नाची माहिती या जोडप्याच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देण्यात आली आहे.ई-टाइम्स च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये दोघांच्या लग्नाचा दिवस १२,१३ आणि १४ तारखेपैकी कोणताही एक असू शकतो.लवकरच जवळच्या लोकांना लग्नाची आमंत्रणे पाठवली जातील.

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आधी कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची (डिसेंबर) बातमी आली, त्यानंतर राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची (नोव्हेंबर) बातमी आली.अंकिता लोखंडे आणि विकी जैन डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासूनअंकिता आणि विकी दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत.दोघे नुकतेच एका दिवाळी पार्टीत दिसले होते, जिथे अंकिता आणि विकीने एकमेकांना किस करून आपले प्रेम लोकांसमोर व्यक्त केले होते, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.