Home » प्रियांका आणि निक यांच्या नात्यामध्ये दुरावा? प्रियांकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल…
Entertainment

प्रियांका आणि निक यांच्या नात्यामध्ये दुरावा? प्रियांकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल…

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे आवडते जोडपे आहेत.मात्र आता या दोघांबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.सोमवार,२२ नोव्हेंबर रोजी प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टा बायोमध्ये बदल केले.या बदलानंतर बातम्यांचा बाजार तापला आहे.खरं तर,प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून तिच्या पतीचे आडनाव ‘जोनस’ काढून टाकले आहे.

प्रियांका-निकचा घटस्फोट?

जेव्हापासून प्रियांकाने हे केले तेव्हापासून चाहते आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.निक आणि प्रियांकाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत.दोघेही घटस्फोट घेणार आहेत,असे काहींचे मत आहे.तसे, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की प्रियांकाने पती निक जोनससह तिचे आडनाव ‘चोप्रा’ इन्स्टा बायोमधून काढून टाकले आहे.

चाहते नाराज होत आहेत…

अनेक सोशल मीडिया वापरकर्ते आणि चाहते याबद्दल नाराज आहेत आणि ट्विट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी सांगणार होतो की, निक आणि प्रियांकाचे ब्रेकअप झाले आहे असे होऊ शकत नाही.दोघेही दिवाळीला एकत्रच होते. पण आता असं वाटतंय की माझी चूक आहे. दुसऱ्या यूजरने विचारले, ‘निक आणि प्रियांकाचा घटस्फोट झाला आहे का???

दिवाळीत हे जोडपे एकत्र दिसले होते…

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस एकत्र दिसले होते.दोघांनी एकत्र खरेदी केलेल्या नवीन घरात दिवाळी साजरी केली होती.या सेलिब्रेशनमध्ये हॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. प्रियांकाने तिच्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटोही शेअर केले होते,जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता प्रियांकाने निकचे आडनाव काढून टाकण्याचे कारण काय आहे, हे फक्त तीच सांगू शकते.