Home » बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती राहुल गांधीवर फिदा…!
Entertainment

बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती राहुल गांधीवर फिदा…!

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहेत. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा मुलगा राहुल गांधी दिसायला खूपच देखणा आहे, पण आजपर्यंत त्याला एकही मुलगी इतकी आवडली नाही की तिला सात जन्माच्या बंधनात बांधता येईल. सोशल मीडियावर राहुल गांधींना लोक ‘पप्पू’ या नावाने हाक मारत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांनी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आणि कपूर कुटुंबाच्या लाडक्या मुलीसह अनेक मुलींची मने जिंकली आहेत.

आता राहुल गांधींना कोणत्या अभिनेत्री पसंत करत होती हे जाणून घेन्याची तुम्हालाही उत्सूकता वाटत असेल, तर या प्रश्नाचे उत्तर आहे करीना कपूर, होय, करीना कपूरने Rendezvous With Simi Garewal च्या एका एपिसोडमध्ये राहुल गांधींवर क्रश झाल्याची चर्चा मान्य केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शोच्या व्हिडिओमध्ये सिमी ग्रेवाल करीना कपूरला विचारते की तिला कोणाला डेट करायचे आहे, ज्यावर करीना म्हणाली, ‘मला हे सांगायचे की नाही हे माहित नाही, मला काही फरक पडत नाही. वादग्रस्त असला तरी हरकत नाही…मला राहुल गांधींना डेट करायचे आहे.’

करीना पुढे म्हणते. ‘मॅगझिनमध्ये त्याची छायाचित्रे पाहिली आणि त्याच्याशी बोलायला काय हरकत आहे, असा विचार मनात आला. मी चित्रपट कुटुंबातून आहे आणि तो एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आहे. त्यामुळे आमच्यातील संवाद रंजक असेल असे मला वाटते. आता करीना कपूरही लग्नानंतर 2 मुलांची आई बनली आहे पण आतापर्यंत राहुल गांधी एकटे आहेत. लोकही राहुलच्या लग्नाची वाट पाहत आहेत. करीना कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी काळात लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.