Home » बॉलिवूड मधील ‘या’ अभिनेत्रीने दिला लग्नाअगोदरच मुलाला जन्म…चक्क एक वर्षाचा मुलगा झाल्यानंतर केले लग्न…
Entertainment

बॉलिवूड मधील ‘या’ अभिनेत्रीने दिला लग्नाअगोदरच मुलाला जन्म…चक्क एक वर्षाचा मुलगा झाल्यानंतर केले लग्न…

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीने १५ नोव्हेंबरला पूर्ण रितीरिवाजांसोबत लग्न केले.या लग्नात तिचे सर्व खास मित्र उपस्थित होते.त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनोरंजन विश्वातून अनेक स्टार्स पोहोचले होते.मात्र आई-वडिलांच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी आलेल्या मुलाने सर्व लाइमलाइट लुटले.होय, लग्न झालेल्या अभिनेत्रीचा एक वर्षाचा मुलगाही या मिरवणुकीचा भाग झाला. 

गोव्यामध्ये झाला विवाह…

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.या दोघांनी याआधीही लग्न केले होते मात्र पुन्हा एकदा ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनामुळे पूजाने कुणालसोबत कोर्ट मॅरेज केले होते.मात्र त्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक उपस्थित होते.त्यांची थाटामाटात लग्न करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता या जोडप्याने गोव्यात पुन्हा लग्न केले आहे.हे लग्न १५ नोव्हेंबर रोजी झाले होते,ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुलगा सुद्धा होता लग्नामध्ये हजर…

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा खूप आनंदी दिसत आहेत.लग्नात पूजा तिचा पती कुणालसोबत सुंदर पोज देताना दिसत आहे. यासोबतच जोडप्याच्या गळ्यात हारही पाहायला मिळतो. एका चित्रात हे जोडपे एकमेकांना हार घालताना दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात पूजा तिचा मुलगा कृशिवचे चुंबन घेत आहे आणि त्याच्यासोबत खेळत आहे.

गेल्या वर्षी लग्न होणार होते…

माहितीनुसार,पूजा आणि कुणाल गेल्या वर्षी १५ एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात लग्न करणार होते. ज्याची तयारीही करण्यात आली होती. पण लॉकडाऊनमुळे त्यांना लग्नाचे बेत रद्द करावे लागले.पण १५ एप्रिल रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की,दोघांनी आता अधिकृतपणे लग्न केले आहे.

पूजा या टीव्ही मालिकामध्ये केले आहे काम…

पूजा बॅनर्जीने कोर्टात जाऊन तिचे रजिस्टर वेडिंग केले होते आणि लग्नात खर्च झालेला पैसाही तिने गरजूंच्या मदतीसाठी दान केला होता. त्यामुळे लोकांनी तिच्या कामाचे खूप कौतुक केले.अभिनेत्रीच्या टीव्ही करिअरबद्दल बोलायचे तर ती ‘देवों के देव…महादेव’ या टीव्ही शोमध्ये देवी पार्वतीच्या भूमिकेत दिसली होती.तिने ‘कुबूल है’, ‘सर्वगुण संपन्न’ आणि ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. सध्या अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.