Home » ब्रेसलेट घालण्यामागे हे आहे मुख्य कारण,जाणून तुम्हालाही बसेल धक्का…
Entertainment

ब्रेसलेट घालण्यामागे हे आहे मुख्य कारण,जाणून तुम्हालाही बसेल धक्का…

बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खानने 27 डिसेंबरला आपला 56 वा वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा केला.वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर सलमान खानला सर्पदंश झाला होता.सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर त्याला सापाने दंश केला होता मात्र हा साप विषारी नसल्यामुळे थोड्या उपचारानंतर सलमानला हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले.सलमान खान चा स्वतःचा एक असा अंदाज आहे.त्याची स्टाईल,त्याचे राहणीमान व त्याची शरीरयष्टी हे सर्वच गेल्या अनेक पिढीमधील चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

सलमान खान अगदी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.सलमानने घातलेले निळ्या रंगाचे ब्रेसलेट सध्या चर्चेचा विषय आहे.सलमान आपल्या उजव्या हातामध्ये नेहमी एक निळ्या रंगाचे ब्रेसलेट घालतो.हे ब्रेसलेट कधीही त्याच्या हातामध्ये नाही असे झाले नाही.एका मुलाखतीमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला असता सलमानने स्वतः या ब्रेसलेट च्या वैशिष्ट्या बद्दल सांगितले होते.या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या त्याच्या एका फॅन पेजने प्रसारित केला आहे.या व्हिडिओमध्ये सलमान असे सांगतो की त्याचे वडील व प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सलीम खान अशा प्रकारचे ब्रेसलेट घालत असत व सलमानला ते खूप आवडत असे व तो नेहमी त्या ब्रेसलेट सोबत खेळत असे.

जेव्हा सलमान इंडस्ट्रीमध्ये येऊन काम करायला लागला तेव्हा सलीम खान यांनी सलमान साठी सुद्धा तसेच ब्रेसलेट बनवून दिले.या ब्रेसलेट मध्ये वापरलेला खडा हा फिरोजा या नावाने ओळखला जातो.फिरोजा हा खडा संपूर्ण जगभरातील दोन सजीव खड्यांपैकी एक मानला जातो.असे म्हटले जाते की हा खडा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत असेल तर ती स्वतःकडे आकर्षून घेतो व तो फुटतो.

सलमान खानने आपल्या ब्रेसलेट मध्ये वापरलेला फिरोजा हा खडा हा आत्तापर्यंतचा त्याचा सातवा खडा आहे असे त्याने सांगितले आहे.सलमान या ब्रेसलेट बद्दल खुपच हळवा आहे.एकदा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करताना पनवेल येथील फार्महाऊसवर त्याचे हे ब्रेसलेट हरवले होते त्यावेळी तो खूपच अस्वस्थ झाला होता.मात्र त्याने आपल्या मित्रांसोबत हे ब्रेसलेट शोधून काढले.हे ब्रेसलेट त्याच्या काकांनी इंदोर येथून बनवून दिलेले आहे.सलमान खानचे वडील सलीम खान यांचे मूळ हे इंदूर येथे आहे.

सलमान चे आजोबा अब्दुल रशीद खान हे अफगाणिस्तान मधून इंदोर मध्ये आले होते व यानंतर आज सुद्धा सलमानचे अनेक नातेवाईक इंदोर मध्ये आहेत.सलमान खान चे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सलीम खान यांनी एक अध्यात्मिक उपाय म्हणून हा खडा त्याच्या काकांकडून इंदूर येथून बनवून घेतला व यानंतर सलमानला त्याची गाडी रुळावर आल्यासारखे वाटले. म्हणून तो कधीही हे ब्रेसलेट आपल्या हातातून उतरवत नाही.