Home » मराठी चित्रपट सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या विरुद्ध पत्नीने केला कौटुंबिक हिंसासारचा गुन्हा दाखल…
Entertainment

मराठी चित्रपट सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या विरुद्ध पत्नीने केला कौटुंबिक हिंसासारचा गुन्हा दाखल…

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पत्नीवर प्राणघातक हल्ला आणि मानसिक व शारीरिक अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संदर्भात स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय २९,रा. करिश्मा सोसायटी,कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.या घटनेने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

करिअरपेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.स्नेहा विश्वासराव यांनीही तिला लोकांसमोर मारहाण आणि अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत मूळचा मुंबईचा असून त्याचे आणि स्नेहा चव्हाणचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. स्नेहा देखील एक अभिनेत्री आहे आणि तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. स्नेहाने अलंकार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.अनिकेतने पोस्टर बॉईज, मस्का, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अनिकेतने अंजाने अनाहणे या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ऊन-पॉज आणि नकळत या मालिकेतही तो दिसला आहे.