Home » महाभारतातील श्रीकृष्ण फेम नीतीश भारद्वाज यांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय…
Entertainment

महाभारतातील श्रीकृष्ण फेम नीतीश भारद्वाज यांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय…

टेलिव्हिजन वरील आतापर्यंत सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेल्या महाभारत या मालिकेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारलेले अभिनेते नीतीश भारद्वाज यांनी आपली पत्नी स्मिता सोबत 12 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नीतीश भारद्वाज आणि स्मिता हे दोघे ‌2019 सालापासून वेगळे राहत होते.स्मिता या पेशाने आय ए एस अधिकारी आहेत.या दोघांना दोन जुळ्या मुली आहेत.एका वर्तमानपत्राला यासंदर्भात नीतीश भारद्वाज यांनी पुष्टी केली आहे.नीतीश भारद्वाज यांनी घटस्फोट घेणे हे मरण्यापेक्षा ही जास्त वेदनादायी असते असेही म्हटले आहे.

नितीश भारद्वाज यांनी त्यांनी घटस्फोटासाठी 2019 साली अर्ज केला असल्याचे सांगितले आहे.मात्र नितीश‌ यांनी घटस्फोट घेण्यामागे काय कारण आहे ते सांगितले नाही.नीतीश यांनी सध्या आपली केस ही न्यायालयात सुनावणी होत असल्याचे सांगितले.घटस्फोट घेणे हे मृत्यू पेक्षा जास्त वेदनादायी असते व तुम्ही आयुष्यभर एक जखम बाळगून जगता असेही नीतीश यांनी म्हटले आहे.

पती पत्नी विभक्त झाल्यानंतर सर्वात जास्त प्रभाव हा मुलांवर पडतो असेही त्यांनी सांगितले व मूलांवर याचा कमीतकमी प्रभाव पडावा यासाठी पती व पत्नी यांनी परस्पर सामंजस्याने प्रयत्न करणे आवश्यक असते.सध्या नीतीश यांच्या पत्नी स्मिता मूलींसोबत इंदोर मध्ये वास्तव्य करून आहेत.

महाभारतातील श्रीकृष्ण या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले नितीश भारद्वाज यांनी दिग्दर्शन सुद्धा केले आहे.पितृऋण हा नीतीश भारद्वाज यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता.या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.सध्या अभिनय क्षेत्रामध्ये लोकप्रिय जोड्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी अठरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.