Home » म्हशीच दूध काढतानाचा ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडिओ तुफान वायरल!
Celebrities Entertainment Movies

म्हशीच दूध काढतानाचा ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडिओ तुफान वायरल!

बॉलिवूडमधील पार्श्वगायिका नेहा कक्कर प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.नेहाच्या शानदार गायकी मुळे ती ओळखली जाते तसेच तिच्या चुलबुल्या अंदाजामुळे सुद्धा देखील प्रेक्षकांमध्ये तिला पसंत केली जाते.नेहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते व अगदी रोजच आपले नवनवीन छायाचित्र आणि व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वी नेहा तिच्या गर्भवती असण्याच्या बातमी वरूनही चर्चेत होती.

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी नेहा सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.सोशल मीडियावर नेहमीच आपल्या गाण्याचे व्हिडिओ अपलोड करणारी नेहा या व्हिडिओमध्ये मात्र एका वेगळ्याच अंदाजात दिसून आली आहे व हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतही पडला आहे. या व्हिडिओ मध्ये नेहा म्हशीचे दूध काढताना दिसत आहे. ती ज्याप्रकारे म्हशीचे दूध काढत आहे त्यावरून तिला या कामाची खूप पूर्वीपासून सवय आहे असे दिसून येते.

नेहा आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर खूपच सक्रिय असते व ती आपल्या आयुष्यातील विविध घटना व्हिडिओ आणि फोटो च्या माध्यमातून चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते त्यामुळेच तिचे फॅन फॉलोइंग सुद्धा खूप जास्त आहे.

या व्हिडिओमध्ये नेहा म्हशीच्या जवळ बादली घेऊन बसली आहे व ती अगदी सफाईदारपणे म्हशीचे दूध काढत आहे.तिच्या बरोबर अजून एक व्यक्ती बसलेली आहे ज्यांच्या सोबत ती काही गप्पा मारताना दिसत आहे.यावेळी तिने आपल्या डोक्यावर एक मुंडासेही बांधले आहे .थोडा वेळ दूध काढल्यानंतर नेहा तिथून निघून जाते. तिचा हा व्हिडिओ फॅन पेज वर शेअर करण्यात आला आहे व त्याला खूप मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे.