Home » मुकेश अंबानींच्या घरी नोकरी करण्यासाठी द्यावी लागते युपीएससी सारखी कठीण परीक्षा…
Entertainment

मुकेश अंबानींच्या घरी नोकरी करण्यासाठी द्यावी लागते युपीएससी सारखी कठीण परीक्षा…

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील श्रीमंत उद्योजकां पैकी एक मानले जातात.मुकेश अंबानी हे नेहमीच प्रसारमाध्यमांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.केवळ मुकेश अंबानी नव्हे तर त्यांच्या पत्नी व मुले सुद्धा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांचे श्रीमंती राहणीमान हा तर नेहमीच बातम्यांचा विषय असतो.मुकेश अंबानी यांचे घर हे जगातील महागड्या घरां पैकी एक आहे.

ॲन्टीलिया या निवासस्थानी मुकेश अंबानी राहतात.या आलिशान घराची देखरेख करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्याकडे खूप मोठा कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे.मुकेश अंबानींच्या घराची देखरेख करण्यासाठी व विविध कामांसाठी त्यांच्याकडे तब्बल सहाशे कर्मचारी आहेत.हे कर्मचारी 24 तास विविध शिफ्टमध्ये त्यांच्या घरामध्ये काम करत असतात.या कर्मचाऱ्यांना लाखोंच्या मूल्यामध्ये पगारही दिला जातो.भारतीय मूल्याच्या तुलनेत हा पगार खूप जास्त आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणारे कर्मचारी हे सुद्धा अतिशय ऐषोरामाचे आयुष्य जगतात.त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेत असतात.मात्र मुकेश अंबानी यांच्या घरात नोकरी मिळणे ही सोपी प्रक्रिया नाही.यासाठी सर्वात अगोदर एक अवघड परीक्षा पास व्हावे लागते.मुकेश अंबानी यांच्या घरातील कर्मचाऱ्यांची नेमणूक ही सुद्धा एखाद्या कंपनी कर्मचाऱ्यांच्या नेमणूकी प्रमाणेच असते.त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी च्या जाहिराती प्रसिद्ध होतात व यासाठी लोक नोकरीचे फॉर्म भरतात.

यानंतर त्यांना एक लिखित परीक्षा द्यावी लागते.या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा प्रमाणेच काही सामान्यज्ञानावर आधारित व हॉटेल मॅनेजमेंट वर आधारित प्रश्न असतात.या प्रश्नांची उत्तरे लिहून ही परीक्षा उत्तीर्ण झाले तरच संबंधित कर्मचा-याला नोकरी दिली जाते.अंबानी कुटुंब ज्या एंटिलिया घरामध्ये राहते ते घर जगातील सर्वात महागडे आहे.या घराची उंची 570 फूट असून या घरामध्ये 27 मजले आहेत.या घरांमध्ये एकापेक्षा एक सरस अशा सुख सोयी आहेत.यामध्ये होम थिएटर,स्विमिंग पूल,कॅफेटेरिया,स्नोरुम अशा विविध सोयी आहेत.हे घर तसेच अद्ययावत ठेवण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर दिला जातो.