Home » ‘या’ कारणामुळे कोकिलाबेन अंबानी परिधान करतात फक्त गुलाबी रंगाच्या साड्या…!
Entertainment

‘या’ कारणामुळे कोकिलाबेन अंबानी परिधान करतात फक्त गुलाबी रंगाच्या साड्या…!

मुकेश अंबानी हे संपूर्ण जगभरातील यशस्वी उद्योजकां पैकी एक मानले जातात.विविध क्षेत्रांमधील उद्योगांमुळे आज मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक गणले जातात.मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंबीय अतिशय आलिशान असे आयुष्य जगतात.मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी व मुलांच्या राहणीमान याबद्दल नेहमीच प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येत असतात.मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि मुलांप्रमाणे त्यांच्या आई कोकिलाबेन अंबानी या सुद्धा आपल्या राहणीमानामुळे चांगल्याच चर्चेत असतात.

कोकिलाबेन अंबानी या आपल्या कपडे व दागिन्यांबद्दल खूपच जागरूक असल्याचे दिसून येते.कोकिलाबेन अंबानी यांच्या राहणीमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बहुतेक वेळा गुलाबी रंगाच्या साडी मध्ये दिसून येतात.याला कारण म्हणजे त्यांना गुलाबी रंग खूप जास्त आवडतो व म्हणूनच कोणतेही लग्न असो किंवा एखादा सोहळा यामध्ये कोकिलाबेन अंबानी या गुलाबी रंगाच्या साडी मध्येच दिसून येतात.त्याच प्रमाणे कोकिलाबेन अंबानी यांना आजपर्यंत कधीही सोन्याचे दागिने घातलेले दिसून आलेले नाही.

कोकिलाबेन यांना सोन्याचे दागिने आवडत नाही तर मोत्याचे दागिने आवडतात व म्हणूनच त्या मोत्यांचे दागिने परिधान करतात.मात्र या मोत्यांच्या दागिन्यांची किंमत ही सोन्याच्या दागिन्यां पेक्षाही खूप जास्त असते.कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे गुलाबी रंगाच्या साड्यांचे खूप मोठे कलेक्शन आहे.त्याचप्रमाणे त्या नेहमीच जागतिक स्तरावरील नामांकित ब्रांडच्या पर्स वापरत असतात ज्या च्या किमती या लाखोंच्या घरामध्ये असतात.