Home » ‘या’ कारणामुळे बप्पी लहरी घालतात अंगावर एवढं सोनं…
Entertainment

‘या’ कारणामुळे बप्पी लहरी घालतात अंगावर एवढं सोनं…

बप्पी लहरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जाते. त्यांचे खरे नाव आलोकेश लहिरी आहे.बप्पी लहरी हे त्यांच्या संगीतासोबतच त्यांच्या सोने परिधान करण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात.पण त्यांचे एवढे सोने परिधान करण्यामागे काय खास कारण आहे? स्वतः बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.त्यांनी सांगितले होते की त्यांच्यावर काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव आहे.चला तर मंग जाणून घेऊया यामागचे कारण…

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण बप्पी दा जेवढे सोने घालतात,त्यापेक्षा जास्त सोने त्यांच्या पत्नीकडे आहे.२०१४ मध्ये त्यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे.त्यांनी त्या शपथपत्रात सांगितले होते की,बप्पी दा आणि त्यांच्या पत्नीकडे किती सोने आहे? बप्पी दा यांनी भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

२०१४ मध्ये दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार,बप्पी दा यांच्याकडे ८५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे.या गोष्टीला आता ७ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे,पण त्यांनी हे सोने वाढवले ​​असावे,असा अंदाज बांधता येतो. रिपोर्ट्सनुसार,बप्पी दा यांची एकूण संपत्ती २० कोटींहून अधिक आहे.

बप्पी दा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होतो. एल्विस त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चेन घालत असे.बप्पी दा यांनी मुलाखतीत सांगितले की,जेव्हा मी एल्विसला पहायचो तेव्हा मला वाटायचे की,जेव्हा मी प्रसिद्ध आणि यशस्वी होईन तेव्हा मी एल्विससारखी स्वतःची ओळख निर्माण करेल.त्याबरोबरच मला असे वाटते की सोने हे माझ्यासाठी लक्की आहे.म्हणून ते सोने घालतात आणि यामुळे गायकाबरोबरच माझी एक नवीन ओळख निर्माण झाली.

बप्पीदाच्या पत्नीबद्दल बोलायचे तर तिच्याकडे जास्त सोने आहे.त्यांची पत्नी चित्राणी यांच्याकडे ९६७ ग्रॅम सोने आणि ८.९ किलो चांदी आहे.याशिवाय त्याच्याकडे ४ लाख रुपयांहून अधिक किमतीचे हिरेही आहेत.ही सर्व माहिती बप्पी दा यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

२०१४ मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार,बप्पी दा यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत ३५ लाखांपेक्षा जास्त असेल.तर चांदीचा विचार केला तर तो २-२.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.