Home » ‘या’ कारणामुळे बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी…
Entertainment

‘या’ कारणामुळे बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी…

बॉलीवूडचा शोमॅन म्हणजेच राज कपूर,त्यांना भारताचा महान शोमन मानला जात असे.त्यांचे खरे नाव रणबीर राज कपूर होते.राज कपूर हे केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हते तर ते एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शकही देखील होते.राज कपूर वर अनेक अभिनेत्री जीव ओवाळून टाकत होत्या,पण कोण अशी अभिनेत्री होती जिच्या प्रेमात राज कपूर वेडे झाले होते.एक काळ असा होता जेव्हा राज कपूर आणि नर्गिसची नावे एकमेकांशी जोडली जात होती आणि राज कपूरच्या अफेअरच्या चर्चा सर्वांच्या ओठावर होत्या.राज कपूर नर्गिसवर खूप प्रेम करतात हे संपूर्ण बॉलीवूडला माहीत होते, पण काय झाले की त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

नर्गिस आणि राज कपूर यांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती.असं म्हणतात की राज कपूर नर्गिसला पहिल्या नजरेतच ह्रदय दिले होते.राज कपूर यांचे नर्गिसवर खूप प्रेम होते पण ते आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती, पण असे असतानाही राज कपूर यांनी नर्गिसला अनेकवेळा सांगितले होते की मी तिच्याशी लग्न करणार आहे.

जेव्हा त्यांच्या प्रेमाला नऊ वर्षे पूर्ण झाली,तेव्हा नर्गिसला वाटले की राज कपूर आता तिच्यावर प्रेम करत नाहीत.राज कपूर यांना त्यांच्या कुटुंब आणि वडिलांविरुद्ध बंड करायचे नव्हते.मग काय,दोघांचेही मार्ग एकमेकांपासून वेगळे झाले होते.

दोघांची भेट कशी झाली ?

त्यावेळी राज कपूर २२ वर्षांचे होते.दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.दोघांनाही लग्न करायचे होते,पण आई-वडील अजिबात तयार नव्हते.या नात्याला ना नर्गिसची आई जद्दनबाईंनी मान्यता दिली ना राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर यासाठी तयार झाले.

अनेक वर्षांचे नाते का तुटले ?

हळूहळू दोघांमधील गैरसमजाची दरी रुंदावू लागली.दरम्यान, नर्गिसने १९५७ मध्ये मेहबूब खानचा मदर इंडिया हा चित्रपट साइन केला होता.या चित्रपटात तिच्या विरुद्ध सुनील दत्त होता.चित्रपटाचे शूटिंग चालू होते.यादरम्यान एके दिवशी सेटवर आग लागली.सुनील दत्तने स्वतःच्या जीवावर खेळून या आगीतून नर्गिसचे प्राण वाचवले,असे म्हटले जाते.यानंतर दोघेही जवळ आले आणि वर्षभरातच त्यांनी लग्न केले.