Home » ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे…
Entertainment

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे…

बॉलिवूडमधील कलाकारांच्या वाट्याला जितक्या जास्त प्रमाणात प्रसिद्धी येते तितकेच वाद-विवाद सुद्धा असतात. बॉलीवूडमधील कलाकारांना त्यांचे खाजगी आयुष्य राहतच नाही.यामुळेच अनेकदा विवाहित कलाकारांच्या आपल्या जोडीदारासोबत वाद-विवाद होतात व यातून ते  विभक्तसुद्धा होतात.अशी प्रकरणे केवळ सध्याच्या काळात दिसत नाही तर काही ज्येष्ठ कलाकारांच्या बाबतीत सुद्धा असे घडले आहे.चला तर मंग आज आपण नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया.

नाना पाटेकर हे मराठीतील एक दिग्गज कलाकार आहेत व त्याचप्रमाणे त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांनी ॲक्शन पट,विनोद पट अशा सर्वच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.वेलकम,अब तक छप्पन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय अतिशय उत्तम झालेला आहे.

नाना पाटेकर यांचे वैयक्तिक आयुष्य सुरुवातीपासूनच वादांमध्ये अडकलेल्या दिसून येते.नाना पाटेकर यांचे नाव मनिषा कोईराला,आयेशा जुल्का यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले व याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर झाला.नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर यांची भेट एका नाटका दरम्यान झाली व या दोघांनीही काही काळातच लग्न केले. या दोघांना मल्हार हा मुलगा सुद्धा आहे.मल्हार चित्रपट सृष्टी पासून दूर आहे.नीलकांती पाटेकर या काही चित्रपटांमध्ये आपल्याला दिसल्या आहेत. अग्निसाक्षी या चित्रपटादरम्यान मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या दरम्यान जवळीक वाढू लागली व यामुळेच नीलकांती पाटेकर आणि नाना पाटेकर यांनी परस्पर सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.