Home » रतन टाटांच्या संपत्तीचा वारसदार होण्याची शक्यता…!
Entertainment

रतन टाटांच्या संपत्तीचा वारसदार होण्याची शक्यता…!

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या मूलभूत उद्योगांची पायाभरणी करून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थे मध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य भारतातील काही महान उद्योजकांनी केले आहे.आज या उद्योजकां मुळेच भारतीय अर्थव्यवस्था कोरोना सारख्या महामारी मध्ये सुद्धा तग धरून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.भारतामधील मोजक्या उद्योजकांचे नाव जागतिक स्तरावर संपत्तीच्या बाबतीत सुद्धा अग्रक्रमावर आहे.त्यामध्ये रतन टाटा हे आघाडीवर आहेत.रतन टाटा हे आज घडीला संपूर्ण जगातील यशस्वी उद्योजक मानले जातात व त्यांच्या संपत्तीचे मुल्य सुद्धा खूप जास्त आहे.आजघडीला यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची वानवा नाही.

रतन टाटा हे समाजामध्ये दानधर्म करणे किंवा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन गरजूंना मदत करणे या सारख्या उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर असतात.म्हणूनच त्यांच्याविषयी भारतीय जनतेमध्ये एक प्रकारचा आदर आहे.रतन टाटा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच अलिप्त भूमिका घेतात.रतन टाटा हे अद्यापही अविवाहित आहेत यामुळे त्यांच्या पश्चात त्यांची करोडोंची संपत्ती व त्यांचा वारसदार कोण होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली असते.रतन टाटा हे वैयक्तिक आयुष्यामध्ये अतिशय साधेपणाने आयुष्य जगत असतात.नुकताच त्यांचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये रतन टाटा आपला 84 वा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करताना दिसत आहेत.

आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी छोटासा कप केक कापला व यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या एका तरुण मुलाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.हा तरुण मुलगा रतन टाटा यांच्या कुटुंबीयांपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणीही नसून तो त्यांचा असिस्टंट आहे.रतन टाटांनी आपल्या असिस्टंट सोबत वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करत एक नवीन आदर्श समाजासमोर उभा केला.मात्र या व्हिडिओ नंतर रतन टाटा यांच्या पश्चात त्यांचा वारसदार हा मुलगाच असू शकतो अशा चर्चांना उधाण आले आहे.हा मुलगा नक्की कोण आहे हे आज आपण जाणून घेऊया.

रतन टाटांसोबत काम करणारा व त्यांच्यासोबत या व्हिडिओ मध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करणारा मुलगा आहे शांतनू नायडू होय.शंतनू नायडू हा 2018 सालापासून रतन टाटांसोबत सोबत काम करत आहे.शांतनूने कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून रतन टाटांचे सोबत काम करणारी शांतनु ची ही पाचवी पिढी आहे.शंतनु नायडू आणि रतन टाटा यांच्यामध्ये काम करताना कोणत्याही प्रकारचा जनरेशन गॅप नसतो हे वेळोवेळी दिसून आले आहे.रतन टाटा हे स्वतः शांतनु च्या कामाचे खूप मोठे चाहते आहेत.

शांतनु हा मोटोपॉ नावाची एक कंपनी चालवतो.या कंपनीद्वारे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात अडकवण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान असलेले व अंधारातही दिसू शकणारे पट्टे बनवले जातात.ही कंपनी भारतामधील वीस शहरांमध्ये काम करते.या पट्ट्या मुळे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना रात्रीच्या वेळी अंधारात दिसू न शकल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होऊ शकते. म्हणूनच मोटोपॉ या कंपनीचे पट्टे रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात लावले जातात‌.शंतनुला रस्त्यावर दरवर्षी अपघातामध्ये बळी पडणाऱ्या कुत्र्यांची संख्या पाहून खूपच हळहळ वाटली होती व यामधूनच त्याने या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले.ज्यावेळी टाटा ग्रुपच्या अंकामध्ये शंतनूच्या या कामाविषयी छापून आले त्यावेळी रतन टाटांना सुद्धा त्याचे खूप कौतुक वाटले कारण ते स्वतः श्वान प्रेमी आहेत.

आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून रतन टाटा यांना शंतनूने पत्र लिहिले व त्यांनी त्याला भेटण्यास सांगितले.शंतनूच्या एकंदरीत कामाविषयी जाणून घेऊन रतन टाटांनी शांतनु च्या मोटोपॉ कंपनी मध्ये गुंतवणूक सुद्धा केली.कारण रतन टाटा हे नेहमीच भारतामधील स्टार्ट अप उद्योगांना मदत देण्यासाठी पुढे असतात.शांतनु चे कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून एमबीए चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रतन टाटांनी त्याला आपल्या सोबत काम करण्याची ऑफर दिली व शांतनने ही ऑफर स्वीकारली सुद्धा.रतन टाटां सोबत काम करताना नेहमीच काहीतरी नवीन ऊर्जादायी शिकायला मिळते असे शंतनूने सांगितले आहे व आमच्या मध्ये कधीही वयाचे अंतर येत नाही असे सुद्धा तो म्हणतो.

शांतनु हा सुद्धा भारतामधील स्टार्ट अप उद्योगांविषयी आस्था असणारा तरुण आहे.आपल्या जवळ असलेल्या अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे तो नेहमीच स्टार्ट अप जगामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन करत असतो.यासाठी प्रत्येक रविवारी त्याच्या इंस्टाग्राम हँडल वर एट यूअर स्पार्क हे एक वेबिनार तो आयोजित करत असतो.या वेबिनार साठी तो 500 रुपये इतकी फी घेतो.ही फी त्याच्या मोटोपॉ कंपनीकडे सुपूर्द केली जाते.covid-19 च्या काळामध्ये त्याच्या या वेबिनार मुळे अनेक उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे.