Home » रस्त्यावरून जातांना जर पैशांचा पाऊस झाला तर? खरोखर असेच झाले चक्क नोटांचा पाऊस पडला…
Entertainment

रस्त्यावरून जातांना जर पैशांचा पाऊस झाला तर? खरोखर असेच झाले चक्क नोटांचा पाऊस पडला…

कधी कधी आपल्या जीवनामध्ये अश्या गोष्टी घडतात की आपला आपल्या डोळ्यावरही विश्वास बसत नाही.कॅलिफोर्नियातील कार्ल्सबॅडमध्ये अचानक नोटांचा पाऊस सुरू झाला आणि काही वेळातच संपूर्ण रस्ता नोटांनी भरून गेला.ज्या ज्या लोकांनी हे दृश्य बघितले ते थक्क झाले.

रस्त्यावरून जाणारे प्रत्येक व्यक्ती गाडीमधून खाली उतरला आणि दोन्ही हातांनी नोटा जमा करू लागला.याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काय घडले होते ते जाणुन घेऊया…

माहितीनुसार कॅलिफोर्निया मधील कार्ल्सबॅडमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.नोटांनी भरलेला ट्रक रस्त्यावरून जात असताना ट्रकचा दरवाजा उघडल्यामुळे पूर्ण रस्त्यावर नोटांचा पाऊस पडला.

रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाने आपआपली गाडी थांबवून दोन्ही हातानी पैसे गोळा केले काहींना तर खूपच आनंद झाला होता.सगळे सुख मिळाल्यासारखे वाटले.

ट्रक चालकाने पैसे गोळा करू नका अशी विनंती केली परंतु लोकांनी त्याचे एकही ऐकले नाही आणि पैसे गोळा करून निघून गेले.व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून पोलीस लोकांचा शोध घेत आहेत.यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.अद्यापही हे समजले नाही की रस्त्यावर किती पैसे विखुरले होते.